Kirit Somaiya : भाजप शिष्टमंडळासह किरीट सोमय्या राज्यपालांच्या भेटीला | पुढारी

Kirit Somaiya : भाजप शिष्टमंडळासह किरीट सोमय्या राज्यपालांच्या भेटीला

मुंबई; पुढारी ऑनलाईन : माझ्या नावाने पोलिसांनी जी तक्रार दाखल केली आहे, ती खोटी असून FIR ही खोटी आहे, हे खार पोलीस स्टेशननेही मान्य केले आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या गुंडांना वाचविण्यासाठी ही बोगस एफआयआर दाखल करण्यात आली असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. याप्रसंगी मुंबई पोलीसांविरूद्ध तक्रार करण्यासाठी भाजप नेते  किरीट सोमय्या हे भाजप शिष्टमंडळासोबत आज दुपारी 12.30 वाजता राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

पोलीस आयुक्त संजय पांडे सांगतील का, खार घटनेची पोलिसांनी खोटी एफआयआर कशी आणि का नोंदवली!!? असा प्रश्न उपस्थित करत सोमय्या आणि भाजप शिष्टमंडळाकडून राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांची  तक्रार करणार असल्याचेही सांगितले.

मी अनुसूचित जातीची असल्याने मुंबई पोलिसांकडून आपल्याला भेदभावाची वागणूक मिळत असल्याची तक्रार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे केली होती. या आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्त सजय पांडे यांनी एक व्हिडिओच ट्विट करत सत्य परिस्थिती दाखवून देत, नवनीत राणा यांचे आरोप खोडून काढले होते. या व्हिडिओत राणा पती पत्नी दोघेही आरामात चहा घेत पोलिसांशी बोलताना आणि अत्यंत सामान्य वर्तन करताना दिसत होते. याबद्दलही सोमय्या यांनी आयुक्त संजय पांडे यांच्यावर टीका केली.

सोमय्यांचा वैद्यकीय अहवाल समोर

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी (23 एप्रिल) शिवसैनिकांकडून झालेल्या हल्लानंतर भाभा रुग्णालयात किरीट सोमय्या यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. यामध्ये सोमय्या यांना झालेली 0.1 सेमीची जखम झाली होती. यामध्ये कोणत्याही प्रकारे सूज किंवा रक्तस्राव नाही. त्यामुळे ही जखम गंभीर नसल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

Back to top button