चंद्रकांत पाटील म्हणाले, तूर्त मनसेशी युती नाही | पुढारी

चंद्रकांत पाटील म्हणाले, तूर्त मनसेशी युती नाही

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सध्या तरी मनसेशी युतीची शक्यता नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगितले. राज ठाकरे हे भविष्यात भाजपचे मित्र असू शकतात. मात्र त्याविषयीचा निर्णय केंद्रीय पातळीवरुन होईल. मनसेसोबत युतीचा निर्णय घ्यायचा असेल तर तो राष्ट्रीय पातळीवर घेतला जाईल. भाजपा कुठल्याही पक्षाला बरोबर घेताना राज्याची कोअर कमिटी निर्णय घेते. खास करुन मनसेसारख्या पक्षासोबत निर्णय घ्यायचा असेल तर केंद्रात होईल, असेही पाटील म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झाले असून येणार्‍या निवडणुकांमध्ये ते भाजपशी युती करतील अशी शक्यता व्यक्त केली जात असताना चंद्रकांत पाटील यांच्या या स्पष्टोक्‍तीने भाजप आणि मनसेच्या संबंधावर वेगळाच प्रकाश पडला आहे.

Back to top button