मुंबई : किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्‍ला | पुढारी

मुंबई : किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्‍ला

मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राणा दाम्‍पत्‍यांना शनिवारी आंदोलन मागे घेतले होते. त्‍यानंतर त्‍यांना खार पोलिसांनी अटक केली. खार पोलिस ठाण्यात किरीट सोमय्या रात्री 10 च्या सुमारास जात होते. त्‍यावळी त्‍यांच्या गाडीवर चप्पल, बाटल्‍या, दगड फेकण्यात आले. तर शिवसैनिकांनी माझ्या गाडीची काच फोडली. मी जखमी झालो, असे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रात्री केले.

अटक झाल्यानंतर खार पोलीस ठाण्यात मुक्कामी असलेल्या राणा दाम्पत्याची चौकशी करण्यासाठी सोमय्या गेले होते. पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.  पोलिसांनी या शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला.

शिवसैनिक सोमय्या यांच्या गाडीवर पाण्याची बाटली आणि चप्पल भिरकावले. तसेच एक वीट फेकण्यात आली पण ती गाडीच्या टपावरून पलिकडे जाऊन पडली. या धांधलीत सोमय्या यांची गाडी वेगाने निघून गेली आणि त्यांच्या मागे केंद्रीय सुरक्षा जवान धावत त्यांची गाडी पकडतानाही दिसले. हा प्रकार घडल्यानंतर शिवसैनिकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी सोमय्या रात्रीच वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झाले. सोमय्या यांच्या अंगावर खिडकीच्या काचा पडलेल्या असून त्यांच्या हाताला लागले आहे. माझ्याही हाताला मार लागल्याचे त्यांच्या एका सहकार्‍याने सांगितले.

सोमय्यांच्या पाठोपाठ मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरही तेथे पोहोचले. खार पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या शिवसैनिकांच्या अंगावर सोमय्या यांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी कोणताही हल्ला केलेला नाही, असे ते म्हणाले. शिवसैनिकांना सोमय्या यांनीच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार देण्यासाठी आपण वांद्रे पोलीस ठाण्यात आल्याचे महाडेश्वर म्हणाले.

Back to top button