World Book Day : २३ एप्रिलला पुस्‍तक दिन का साजरा केला जाताे? | पुढारी

World Book Day : २३ एप्रिलला पुस्‍तक दिन का साजरा केला जाताे?

 पुढारी ऑनलाईन डेस्क :  आज २३ एप्रिल रोजी ‘जागतिक पुस्तक दिन’ (World Book Day)  जगभरात साजरा केला जातो. लोकांमध्‍ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. वाचनसंस्कृती वृद्धींगत व्हावी, पुस्तक आणि लेखकांचा सन्मान करणे हे  या दिवसाचे औचित्य आहे; पण हा दिन कधी आणि का साजरा केला जातो याबद्दल माहीत आहे का? चला तर मग जाणून घेवूया ‘जागतिक पुस्तक दिनाबद्दल. 

World Book Day – २३ एप्रिलच का? 

२३ एप्रिल रोजी ‘जागतिक पुस्तक दिन’  युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात दिन साजरा करतात.  जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिवस (२३ एप्रिल १५६४ ) यांना ऋध्दांजली वाहण्यासाठी युनेस्कोने  २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याची घोषणा केली. योगायोगाने विल्यम शेक्सपिअर यांचा मृत्यूही २३ एप्रिल १६१६ राेजी झाला होता.  

हा दिवस प्रथम २३ एप्रिल १९२३ मध्ये स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये घेण्यात आलेल्या युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेमध्ये जगभरातील लेखकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाईल, अशी घाेषणा करण्‍यात आली  असा हाेती.  

काय आहे यंदाची थीम ? 

दरवर्षी, जागतिक पुस्तक दिनाची एक विशिष्ट संकल्पना (Theme) असते. ती ठरवून कार्यक्रम आखले जातात. जागतिक पुस्तक दिन २०२२ ची थीम ही ‘यु आर अ रिडर’ (‘You Are a Reader) तर २०२१ या वर्षाची थीम ही ‘टु शेअर अ स्टोरी’  (To share a story‘)  अशी होती.  जागतिक पुस्तक दिन जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके भेट देतात. पुरस्कार देतात, पुस्तक वाचन करतात. स्पेनमध्ये तर दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचं आयोजन केले जाते. यामध्ये एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार दिला जातो.  

२३ एप्रिल रोजी कॉपीराइट दिनही साजरा केला जातो. कॉपीराइट म्हणजे एखाद्या लिखाणावर त्या लेखकाचा विशिष्ट हक्क असतो. जर संबधित लेखकाने एखाद्या प्रकाशन संस्थेस करार करुन हक्क दिले तर त्या प्रकाशनाव्यतिरीक्त ते लेखन कोण वापरु शकत नाही . आणि तसे आढळ्यास त्या विरुध्द कारवाई होवू शकते. 

   

Back to top button