इचलकरंजीतील IGM रुग्णालयाला आग, मोठा अनर्थ टळला | पुढारी

इचलकरंजीतील IGM रुग्णालयाला आग, मोठा अनर्थ टळला

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील (IGM) सेमी आयुसीयू वार्डमधील इलेक्ट्रीक स्विच बोर्डमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना (दि. ०२)  मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

यावेळी IGM मध्ये उपस्थित कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मात्र या घटनेमुळे रुग्ण व नातेवाईकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.

परिणामी, रुग्ण व नातेवाईकांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Back to top button