कास्‍टिंग काऊच : हॉटेलला एकटी ये, तुझी लाईफ बनवतो, अभिनेत्रीने सांगितला अनुभव | पुढारी

कास्‍टिंग काऊच : हॉटेलला एकटी ये, तुझी लाईफ बनवतो, अभिनेत्रीने सांगितला अनुभव

मुंबई; पुढारी वृत्‍तसेवा : चित्रपट विश्वात करिअर करण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. अशावेळी नवोदित अभिनेत्रींना कास्‍टिंग काऊच चा वाईट अनुभव येतो. कास्‍टिंग काऊच चा अनुभव एका नवोदित अभिनेत्रीला आलाय. या अभिनेत्रीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्यासाठी निर्मात्‍याने शरीरसुखाची मागणी करण्यात आली.

या निर्मात्‍याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिल्‍याचा प्रकार

महाराष्‍ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडे तक्रार करणाऱ्या नवोदित अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्‍या या प्रकाराची माहिती दिली.

यावेळी महाराष्‍ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे उपस्‍थित होते.

एका हिंदी चित्रपटात रोल देत असल्‍याचे राहुल तिवारीने २९ जुलै रोजी मला फोन करून सांगितले. मात्र याआधी प्रोड्युसरला खूश करावं लागेल, अस तो म्‍हणताच मी त्‍याला नकार दिला.

मात्र, या नंतर वारंवार त्‍याचे फोन येत होते. या प्रकारानंतर मी कुटुंबियांसोबत चर्चा केली.

त्‍यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने मुद्दाम होकार दिल्‍याचे या अभिनेत्रीने सांगितले.

या विषयी अधिक माहिती देताना सदर अभिनेत्री म्‍हणाली, दुसऱ्या दिवशी मला फाउंटन हॉटेलला बोलवण्यात आले. हॉटेलला एकटीच ये, तुला रात्रभर थांबावे लागेल.

तुझी लाईफ बनवतो, असं तो म्‍हणाला. यानंतर आम्‍ही रिक्षाने हॉटेलवर पोहोचलो.

त्‍याच रिक्षाने त्‍या लोकांनी मला पुढे नेलं. पुढे नेत त्‍यांच्या गाडीत बसवलं. त्‍याच्या हातात बंदूक होती. ते मला चार तास फिरवत होते.

मी लाईव्ह लोकेशन शेअर केलं होतं. या दरम्‍यान त्‍यांनी मला दारू घेणार का असही विचारलं. पुढे ते मला नगरला घेऊन गेले. तेथून अलका फार्म हाउसला नेलं.

या ठिकाणी मनसेची टीम पोहोचली त्‍यांनी मला या लोकांपासून वाचवल्‍याचं या अभिनेत्रीनं सांगितलं.

या घटनेवर अमेय खोपकर म्‍हणाले…

पोलिस आम्‍हाला प्रश्न विचारत आहेत. अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे.

यातील जो निर्माता आहे त्‍याच्यावर बलात्‍काराची केस आहे.

या पुढे कोणत्‍याही मुलीला अशाप्रकारे त्रास होऊ देणार नाही. हिंदी भाषिक निर्मात्‍यांनी निघून जावं.

या प्रकरणी पोलिसांनी जी कलम लावली आहेत, त्‍यात या लोकांना जामीन मिळणार असं वाटतं.

पण ते बाहेर आले तर आम्‍ही त्‍यांचे हात पाय तोडू, असा इशारा महाराष्‍ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

अनेक मुलींना अशा प्रकारांचा त्रास होत आहे. या मुलीने घेतलेली भूमिका योग्‍य आहे.

पोलिसांकडे जाण्याआधी आमच्याकडे या, असा सल्‍ला यावेळी महाराष्‍ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी दिला.

यामुळे मनसे आणि हिंदी भाषिक चित्रपट निर्माते यांच्यामधील वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

पहा व्हिडिओ :

Back to top button