कंपनी सेक्रेटरी बनायचंय? | पुढारी

कंपनी सेक्रेटरी बनायचंय?

बैठक आयोजित करणे, संचालन करणे, आढावा घेणे, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी धोरण तयार करणे आदीविषयक महत्त्वाची जबाबदारी कंपनी सेक्रेटरी ला पार पाडावी लागते.

जागतिक आणि आर्थिक उदारीकरण धोरणामुळे कॉर्पोरेट सेक्टरचा प्रचंड विस्तार झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कॉर्पोरेट क्षेत्रात विशेषज्ञांची मागणी वाढत चालली आहे. कंपनी सेक्रेटरी (कंपनी सचिव) हा विशेषज्ञ म्हणून ओळखला जातो.

कंपनी सचिव हा कॉर्पोरेट क्षेत्रातील संचालक मंडळाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि कायदेविषयक बाबींशी निगडित असलेले विषय हाताळण्यासाठी महत्त्वाची व्यक्ती मानली जाते.

कंपनी सचिवपदावर असलेली व्यक्ती कंपनीतील सर्व विभागांशी समन्वय साधणारी असते आणि कंपनीची गरज ही संचालक मंडळापर्यंत पोहोचवण्याचे काम करते.

बैठक आयोजित करणे, संचालन करणे, आढावा घेणे, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी धोरण तयार करणे आदीविषयक महत्त्वाची जबाबदारी कंपनी सेके्रटरीला पार पाडावी लागते.

अभ्यासक्रम विवरण : भारतात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटेरियट ऑफ इंडिया (आयसीएसआय) संस्था कंपनी सेक्रेटरी चे नियमन करते. ही संस्था तीन अभ्यास क्रमांच्या माध्यमातून कंपनी सेक्रेटरी होण्याची संधी उपलब्ध करून देते.

फाऊंडेशन कोर्स हा आठ महिन्यांचा असून, तो बारावीच्या परीक्षेनंतर पूर्ण करता येतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवार नऊ महिन्यांचा कोर्स करण्यास पात्र ठरतो.

कंपनी सेक्रेटरी ची शेवटची पायरी म्हणजे अंतिम परीक्षा दिल्यानंतर उमेदवाराला व्यावहारिक पातळीवर काम करावे लगते. त्यानंतर उमेदवार हा ‘आयसीएसआय’ संस्थेचा सहायक सदस्य ठरण्यास पात्र ठरतो.

शैक्षणिक संस्था : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेेटरी ऑफ इंडिया हा एकमेव अधिकृत आणि मान्यप्राप्त व्यावसायिक शिक्षण देणारी संस्था मानली जाते.

हीच संस्था कंपनी सेक्रेटरीच्या अभ्यासक्रमाचे आणि परीक्षेचे नियोजन करते. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून, अन्य तीन शाखा मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे आहेत.

मानधन : कंपनी सेक्रेटरीला कामाच्या स्वरूपानुसार मानधन दिले जाते. एकंदरीत हा अभ्यासक्रम उमेदवाराला चांगले उत्पन्न मिळवून देणारा ठरतो. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात कंपनी सेक्रेटरीची नितांत गरज असते.

सुरुवातीला दहा हजार ते पंधरा हजार रुपये दरमहा उत्पन्न मिळते. हे वेतन प्राथमिक पातळीवर असून, कालांतराने अनुभव वाढल्यानंतर 30 ते 35 हजारांपर्यंत मानधन मिळते.

सतीश जाधव

Back to top button