कोल्‍हापूरमधील पुढील निवडणूक भाजपच जिंकणार :फडणवीस | पुढारी

कोल्‍हापूरमधील पुढील निवडणूक भाजपच जिंकणार :फडणवीस

पुणे, पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोल्‍हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्‍या पोटनिवडणुकीचा निकाल शनिवार (दि.16) रोजी लागला. या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडूण आल्‍या आहेत.  पुणे येथे आज (दि.17) रोजी देवेंद्र फडणविसांनी यांनी या निकालावर आपलं मत मांडलं.

भाजपची मते वाढली

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, कोल्‍हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आम्‍ही मिळालेल्‍या मतावर समाधानी आहोत. या निकालावरून स्‍पष्‍ट दिसून येते की, कोल्‍हापूरात आमची मते वाढली आणि जागा वाढल्‍या आहेत.

या निवडणुकीत आमच्‍या विराेधात तीन पक्ष लढले तरीही त्‍यांच्या मतांची बेरीज पाहा. आम्‍ही एकटे लढून आमची मते वाढली आहेत. त्‍यामूळे 2024 ला भाजपच्‍या उमेदवाराचा विजय हाेईल, असा विश्‍वास फडणवीस म्‍हणाले. संजय राउत यांच्या यांना सध्‍या काही काम नाही. त्‍यामुळे ते वैफल्‍यग्रस्‍त झाले आहेत.  राेज ते टीका करतात. त्‍याच्‍या टीकेला राेज उत्तर काेण देणार? असा सवालही त्‍यांनी केला.

हेही वाचा  

Back to top button