उमरखेड येथे मित्राने केला मित्राचा दगडाने ठेचून खून..! | पुढारी

उमरखेड येथे मित्राने केला मित्राचा दगडाने ठेचून खून..!

उमरखेड; पुढारी वृत्तसेवा : उमरखेड नागपूर -तुळजापूर महामार्गावर पैनगंगा नदीच्या पुलाजवळ शहरातील २० वर्षीय युवकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना (दि. ३०) उघडकीस आली. अक्षय वसंतराव करे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

उमरखेड येथे घडलेल्या खून प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी केवळ ५ ते ६ तासांतच मुख्यआरोपी आकाश लोंढे याला ताब्यात घेतले. याचबरोबर त्याच्यावर गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सदरील घटना ज्ञानेश्वर कदम यांच्या शेतात कार्तिक ट्रेडिंग कंपनीच्या शेडसमोर घडली.

दरम्यान, मृतदेह दिसल्याने ज्ञानेश्वर कदम यांनी उमरखेड पोलिस स्टेशनला संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, ठाणेदार आनंद वागतकर फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.

सदर युवकाच्या डोक्याला मार लागलेला व गंभीर अवस्थेत आढळून आला होता.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांना २,३ मोठे दगड, २ डिसपोझल ग्लास, दारूची बॉटल मिळाली.

दरम्यान, पोलिसांनी संशयीत चार मित्रांना घेत घटनेचा तपास सुरू केला.

या तपासातून आरोपी आकाश लोंढे याने त्याचा मित्र मृतक अक्षय करेचा दगडाने ठेचून खून केला अशी खळबळजनक माहिती पुढे आली.

पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आनंद वागतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गाडे, विनीत घाटोळ, विजय पतंगे, संदीप ठाकूर करत आहेत.

Back to top button