Aadhaar card : 'आधार'वर अजब नाव, मुलीला प्रवेश देण्‍यास शाळेचा नकार | पुढारी

Aadhaar card : 'आधार'वर अजब नाव, मुलीला प्रवेश देण्‍यास शाळेचा नकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अलिकडे बहुतांश ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे. शाळा प्रवेश करताना पालकांकडे आधार कार्ड मागितले जाते. मात्र यातूनच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीला सरकारी शाळेत आधार कार्डवर  (Aadhar card) नाव नाही म्हणुन चक्क मुलीला शाळेत प्रवेशच नाकारला. त्या मुलीच्या नावाऐवजी ‘मधु का पांचवा बच्चा’ असं लिहण्यात आले होते. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधील बिलसी तालुक्यातील रायपुर गावात. 

उत्तर प्रदेशमधील बिलसी तालुक्यातील रायपुर गावातील रहिवासी असलेले दिनेश यांना एकुण पाच मुले. ते आपली मुलगी आरतीला सरकारी शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेले.  त्यांच्याकडे आधार कार्डची मागणी केले; पण आधार कार्डवर नावचं नव्‍हते. आधार कार्डवर नाव नाही म्हणुन आरतीला शाळेत चक्क प्रवेश नाकाराला.

आधार कार्डवर चक्क आरतीच्या नावाऐवजी  ‘मधु का पांचवा बच्चा’ असे लिहण्यात आले  होते; पण नाव नसल्याने शिक्षिका एकता वार्ष्णेय यांनी मुलीला शाळेत प्रवेशन नाकारला. तसेच दिनेशला  आधार कार्ड दुरुस्ती करण्यास सांगितले. दिनेश यांनी सांगितले की आधार कार्डवर नंबरही नव्हता. आधार कार्डवर नाव नोंदविण्यात आले नाही. या  चुकीमुळे आरतीला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला आहे.

 Aadhaar card : आधार कार्ड सोशल मीडियावर व्हायरल

‘मधु का पांचवा बच्चा’ असं लिहलेलं हे कार्ड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. आणि सरकारी कामातील निष्‍काजीपणाची चर्चा रंगली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button