अजित पवार : मुख्यमंत्र्यांना गलिच्छ भाषा वापरणाऱ्या राणेंना फटकारले! | पुढारी

अजित पवार : मुख्यमंत्र्यांना गलिच्छ भाषा वापरणाऱ्या राणेंना फटकारले!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अजित पवार : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणात पुरस्थितीची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत गलिच्छ भाषा वापरली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंना चांगलेच फटकारले आहे. त्यांनी नाव न घेता राणेंचा समाचार घेतला. ते म्हणाले की, काही नेते पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी दौरे करत आहेत. हा अधिकार प्रत्येकालाच आहे. आम्हीही विरोधात असताना दौरे केले, पण जिल्हाधिकारी, तहसिलदार, प्रांत कुठं आहे याची विचारणा केली नाही. हे पुरग्रस्तांना पाहण्यासाठी येतात की अधिकाऱ्यांना? मुख्यमंत्र्यांना अशी भाषा कुणी वापली नव्हती.

यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवार यांच्यापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, अशा शब्दात अजित पवारांनी राणेंना फटकारले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूण दौऱ्यात फोन करुन जिल्हाधिकाऱ्यांवर राग काढला होता. यावेळी तुम्ही उपस्थित का नाही? असा सवाल फोन करून केला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये असल्याचे सांगताच नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख अत्यंत हीन पातळीवर जाऊन भाषा वापरली होती.

हे ही वाचलं का?

Back to top button