तीन दारुड्या पोरींची मुंबई पोलीसांशी हुज्जत, कॅालर पकडत घातला राडा | पुढारी

तीन दारुड्या पोरींची मुंबई पोलीसांशी हुज्जत, कॅालर पकडत घातला राडा

पुढारी ऑनलाईन डेस्क: सोशल मिडियावर सध्या तीन मद्यधुंद तरुणींचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी पोलिसाची कॅालर पकडून हुज्जत घालताना दिसत आहे. पोलिसांसोबत उद्धटपणा आणि गैरवर्तन करणारी ही तरुणी नशेमध्ये बेधुंद आहे.

या व्हिडिओमध्ये आपलं कर्तव्य बजावणारा पोलीस त्या मद्यधुंद तरुणींना समजावताना दिसत आहे. या व्हिडिओत तरूणींनी ओला ड्रायव्हरसोबत शिविगाळ करत हुज्जत घातलेली पहायला मिळते. दरम्यान या संबंधित प्रकरणाची पोलिसांनी दखल घेत चौकशी करत असताना या तरूणींनी त्यांच्याशी वाद घातला.

हे प्रकरण नेमकं काय आहे

मद्यधुंद अवस्थेतल्या तीन तरुणींचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या तरूणी ओला चालकाला शिविगाळ करतात. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ ओला ड्रायव्हरने शूट केला. या व्हिडिओमध्ये हा ओला ड्रायव्हरने सर्व प्रकरणाची माहीती देत या तरूणींवर कारवाई करण्याची मागणी पोलीसांकडे केली. यानंतर संबंधित प्रकरणाची पोलिसांनी दखल घेत घटनास्थळी भेट दिली. दरम्यान व्हिडिओच्या शेवटी यावेळी या तरूणींनी या पोलीस अधिकाऱ्यांशी देखील वाद घातलेला दिसत आहे.

मुंबईच्या सुरक्षिततेकरिता अहोरात्र मुंबईकरांच्या सेवेत मुंबई पोलीस असतात. या सर्व तरूणी मुंबईच्याच असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले. दरम्यान या मद्यधुंद तरूणींनी केलेले गैरवर्तन हा प्रकार गंभीर आहे.

पोलिसांसोबत अशा प्रकारे कॅालर पकडण्यापर्यंत मजल जात असेल तर यांच्यावर होणाऱ्या कारवाईला इतका उशिर का व्हावा, असा प्रश्न आता समाजमाध्यामांधून केल्याचे समोर येत आहेत.

यापूर्वी देखील अशा प्रकारे कायदा मोडल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मद्य प्रशान करुन रस्त्यावर हुज्जद घालणाऱ्यांवर कारवाई केल्याचेही प्रकार आहेत. आता या प्रकरणात मुंबई पोलीस काय कारवाई करतात, ते पहावं लागेल, ओला ड्रायव्हरने या प्रकरणात कारवाईच्या केलेल्या मागणीची दखल घेतली जाते का, ते येत्या काळातच कळेलं.

हेही वाचा

Back to top button