सांगली : भररस्त्यात तरुणाचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट | पुढारी

सांगली : भररस्त्यात तरुणाचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : सांगली येथील सिव्हील रुग्णालय ते बस स्थानक या रस्त्यावर रोहन चंद्रकांत नाईक (वय 28) राहणार लक्ष्मीनारायण कॉलनी शंभर फुटी रोड या तरुणाचा धारदार हत्याराने हल्ला करून निर्घुण खून करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. मात्र रोहनचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे सोमवारी रात्री आरटीओ एजंट चा खून झाल्यानंतर आज पुन्हा मुख्य रस्त्यावर खून झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. चोरांचा शोध आणि हल्ला होण्याचे कारण याची माहिती पोलिस घेत आहेत.

Back to top button