महाराष्ट्रात सर्वाधिक काळ आमदार असलेले भाई गणपतराव देशमुख अत्यवस्थ

सांगोला ; पुढारी वृत्तसेवा : डाव्या चळवळीचे अध्वर्यू, माजी मंत्री आणि शेतकरी चळवळीचा बुलंद आवाज, सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख (वय 94) अत्यवस्थ आहेत. गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांच्यावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ (सुमारे 55 वर्षे) आमदार म्हणून त्यांनी काम केले आहे.
टेंभू, म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोल्याला आणण्यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले. त्याआधारे सांगोल्याच्या दुष्काळाचा कलंक त्यांनी पुसून परिसराला सुजलाम्-सुफलाम् केले आहे.
- खुशखबर : ‘या’ महिन्यापासून मिळणार मुलांना कोरोना लस
- राज्यपाल म्हणाले पूरस्थितीचा अहवाल राष्ट्रपतींसह केंद्रीय गृहमंत्र्यांना देणार
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करीत शेतकरी, कष्टकर्यांच्या मुलांची सोय केली. कापसाला हमीभाव देण्यासाठी स्वत:च सांगोला तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणीची स्थापना करीत ती उत्तमपणे चालवून दाखविली आहे.
- हार्दिक पांड्या कडून पदार्पण करणाऱ्या चमिका करुणारत्नेला मिळाले खास गिफ्ट
- अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या कवितेची चर्चा; बेरंग, बेचव आयुष्याला कलाटणी
त्याच जोरावर मोदी लाटेतही 2013 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने सांगोल्यातून आमदार म्हणून त्यांना संधी दिली होती. 2018 च्या निवडणुकीत मात्र त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.
अगदी वयाच्या 94 व्या वर्षीही चार महिन्यांपूर्वीपर्यंत ते लोकहितासाठी सक्रिय होते. गेल्या महिन्याभरापासून त्यांची प्रकृती खालावली आहे.
- पॉर्न व्हिडिओ रॅकेट प्रकरणी राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- मिझोराम-आसाम सीमासंघर्ष पुन्हा उफाळला, हिंसाचारात ६ पोलिसांचा मृत्यू
त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्याने त्यांना सोलापूरला अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
त्यांच्यावर पाच दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना आराम मिळाला होता. परंतु, सोमवारपासून पुन्हा प्रकृती खालावली आहे.
- पुणे सहकार कार्यालय : सहकारच्या नियमित बदल्यांसाठी अधिकार्यांची ‘फिल्डिंग’
- B’day Girl : कृती सेनॉनने महेश बाबूसोबत केला होता डेब्यू, हे ५ चित्रपट ठरले खास
- पुन्हा मुसळधारेचे संकट, ‘कोल्हापूर’सह सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट