'द काश्मीर फाईल्स' हा सिनेमा टॅक्स फ्री करा; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांना विनंती | पुढारी

'द काश्मीर फाईल्स' हा सिनेमा टॅक्स फ्री करा; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांना विनंती

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हा सिनेमा पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्य प्रदेश सरकारने टॅक्स फ्री केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही हा सिनेमा टॅक्स फ्री करावा, अशी विनंती भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केलेली आहे.

नितेश राणे यांनी हे पत्र ट्विट करत ही माहिती दिली आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, “जम्मू- काश्मिरमध्ये मुस्लीम दहशवादाला बळी पडलेल्या हिंदुंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त करावा. मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट करमुक्त केल्यास, मुस्लीम दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर येथील हिंदू समाजावर अत्याचार केल्याचे खरे चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहता येईल. हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला लवकर पाहता यावा यासाठी करमुक्त करावा ही विनंती”, अशा आशयाचं पत्र नितेश राणे यांनी ट्विट केलेलं आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. तर या चित्रपटाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या आधीही गुजरात आणि हरियाणा येथे हा चित्रपट करमुक्त केला आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरवरून उत्तर प्रदेशमधील नागरिक इंतेझार हुसैन सय्यद यांनी याचिका केली आहे. चित्रपटात मुस्लिम आणि हिंदू समाजामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, तसेच यामुळे दोन्ही धर्मियांच्या भावना दुखावू शकतात आणि हिंसाचार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने यावर तातडीने मंगळवारी सुनावणी निश्चित केली आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button