International Dog Day : कुत्र्याच्या पिलाला टॉयलेट ट्रेनिंग कसे द्यावे? | पुढारी

International Dog Day : कुत्र्याच्या पिलाला टॉयलेट ट्रेनिंग कसे द्यावे?

पुढारी ऑनलाईन डेस्क : International Dog Day : माणसाचा बेस्ट फ्रेंड म्हणून नेहमी कुत्र्याचा उल्लेख केला जातो. कुत्रा पाळणाऱ्यांची संख्याही वाढत चाललेली आहे. घरी लहान मुलं हमखास कुत्रा पाहिजे असा हट्ट करताना दिसतात. घरातील लहानग्यांनी कुत्र्यासाठी हट्ट केलेला नाही, असं कुटुंब सापडणं मुश्किल आहे. International Dog Day निमित्त जाणून घेउया कुत्र्याच्या पिलाला टॉयलेट ट्रेनिंग कसे द्यावे?

पण कुत्र्याचं पिलू घरी आणल्यानंतर सर्वांत मोठी समस्या निर्माण होते ती म्हणजे त्या पिलाला शी-शू बाहेर करण्याची सवय कशी लावायची?

हे फार कठीण नसलं तरी संयमाची परीक्षा घेणारा आहे. जर तुम्ही कुत्रा आणणार असाल तर या टिप्स खास तुमच्यासाठी.

१. पिलू घरात आणल्यानंतर एक तर आईपासून दुरावलेलं असतं, जागा ही नवीन असते. घरात नव्याने आलेलं पिलू घरभर शू करून ठेवतं. काही तज्ज्ञांचं मत असं आहे की कुत्र्याला आपली टेरिटोरी मार्क करायची असते, त्यासाठी ते घरात शू करतात.

२. पिलाने शू केलेली असते ती कापडाने किंवा स्पंजने पुसन घ्या, आणि हा कपडा घराबाहेर टाका. ज्या ठिकाणी कुत्र्याला शी-शू करावी असे वाटते तेथे हा कपडा टाकून द्या. आणि त्यानंतर ठराविक वेळाने पिलाला त्या जागी न्या. हळूहळू पिलू तिथे शू करू लागेल. लहान पिलांना शू कंट्रोल होणे कठीण असते. त्यामुळे पिलू लगेच शिकणार नाही. पिलाने घराबाहेर शू केली, तर त्याला गुड डॉग असे प्रेमाने म्हणा, त्याच्या डोक्यावरून हात फिरवा आणि त्याला काही तरी खावू द्या. जर चुकीच्या जागी शू केली तर बॅड डॉग म्हणून रागवा. कुत्र्याला प्रेम केलेलं आणि रागावलेलं कळतं.

३. पिलाने शी बाहेर करावी, यासाठी काय करायचे?. चार महिन्यापर्यंत कुत्र्याची बऱ्यापैकी वाढ होते. या चार महिन्यांत पिलाला दररोज चार वेळा खाऊ द्यावा लागतो. पिलाचे खाऊन झाले की त्याला शी येते. त्यामुळे खायला घातल्यानंतर त्याला बाहेर घेऊन जा. शी आल्यानंतर ते स्वतः भोवती फिरतं आणि शी करतं. येथेही गूड डॉग आणि बॅड डॉगचा नियम विसरू नका.

४. शेवटी कितीही झालं तर तो प्राणी चुका, त्यामुळे चुकणार हे लक्षात ठेवा. त्यामुळे पिलू आणल्यानंतर ते लगेच सर्व काही शिकेल असा काही समज करू नका. कुत्र्यांना रागावलेलं आणि प्रेम केलेलं चांगल्यापैकी कळते, त्यामुळे काय केलं की प्रेम मिळतं हे त्यांना समजू लागतं.

५. यात आपण डॉग ट्रेनरशी बोलून त्याचीही मदत घेऊ शकता.

हे ही वाचा :

 

Back to top button