कोल्हापूर : तुळशी धरण ९५ टक्के भरले | पुढारी

कोल्हापूर : तुळशी धरण ९५ टक्के भरले

धामोड; पुढारी वृत्तसेवा : तुळशी धरण ९५ टक्के भरले आहे. तुळशी धरण परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. पूर परिस्थितीचा विचार करता आणि धरण पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडणे गरजेचे आहे.

अधिक वाचा – 

पाऊस व धरण पाणी पातळी याचा विचार केला आहे. आज दुपारी २ ते ३ या वेळेत ७५० ते १००० क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्याचे नियोजित आहे. अशी माहिती धामोडच्या पाटबंधारे शाखेकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा – 

तुळशी नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे, असा इशाराही देण्यात आला आहे.

अधिक वाचा- 

राधानगरी धरण पूर्ण भरले राधानगरी धरण पूर्ण भरले

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. दरम्यान, काल रात्री ११ वाजता राधानगरी धरणाचा पाचवा दरवाजा उघडला.

तसेच, धरणातून ८,५९४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

राधानगरी धरण क्षेत्रात आत्तापर्यंत एकूण २८२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गेट क्रं. ३,४,५,६,७ प्रत्येक द्वारातून १,४२८ क्युसेक्स प्रमाणे एकूण ७,१४० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

दरम्यान रविवारी (दि. २५) दुपारी राधानगरी धरण पूर्ण भरले.

रविवारी सायंकाळी सातवाजेपर्यंत धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार खुले झाले होते. यात ३, ४, ५, ६ क्रमांकाच्या दरवाजांचा समावेश होता.

राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. यामुळे भोगावतीसह पंचगंगा नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील ३६६ गावे अजूनही पूरबाधित आहेत. सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

पंचगंगा नदीने विक्रमी ५६ फूट तीन इंच पाणी पातळी गाठली आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहर जलमय बनले आहे.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ – कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात : Flooded Kolhapur City, Drone Video 

Back to top button