लाॅर्ड ओवेन म्हणतात, "पुतीन स्टेराॅईड घेतात म्हणून इतके आक्रमक" | पुढारी

लाॅर्ड ओवेन म्हणतात, "पुतीन स्टेराॅईड घेतात म्हणून इतके आक्रमक"

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया-युक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह पश्चिमेकडील अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले असले तरी, राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी कुणालाच न जुमानता युक्रेनवर थेट हल्ला केला. अमेरिकेलाही  पुतीन यांनी जास्त महत्व दिलं आहे. अशात ६९ वर्षांचे पुतीन यांचा फिटनेस आणि तेजलदार चेहरा पाहता ते स्टेराॅईड घेत असावेत, असं मत ब्रिटनच्या माजी परराष्ट्रमंत्री लाॅर्ड ओवेन यांनी दावा केला आहे.

ब्रिटनचे हे माजी परराष्ट्रमंत्री लाॅर्ड ओवेन हे व्यवसायाने डाॅक्टरआ आहेत. टाईम्स रेडिओला माहिती देताना त्यांनी हा दावा केला.ओवेन यांनी सांगितलं की, “पुतीन यांचा चेहरा पहा, तो खूपच बदलला आहे. त्यांच्या चेहरा पाहता प्लॅस्टिक सर्जरी केली आहे किंवा त्यांनी बोटाॅक्स नावाचे इंजक्शेन घेतले असावे, असा लोकांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे.”

“पुतीन एकतर बाॅडीबिल्डरप्रमाणे एनाबाॅलिक स्टेराॅइड्स किंवा काॅर्टिकोस्टेराॅईड्स घेत असावेत. अशा स्टेराॅईड्सच्या वापरामुळेच चेहऱ्यावर बदल होतात. अशी औषधं घेणारा व्यक्ती जास्त आक्रमक होतो. त्याचबरोबर रोग प्रतिकारकशक्ती कमी होते. त्यामुळे कोरोनात अशी व्यक्ती सहज बळी पडू शकते”, अशीही माहिती लाॅर्ड ओवेन यांनी दिली.

“पुतीन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ते विलिगीकरणात गेले होते. ते कोणालाही तेव्हा भेटत नव्हते. त्यावरून पुतीन स्टेराॅइड घेत असावेत”, असं ओवेन यांनी सांगितलं आहे. तसं पाहिलं तर व्लादिमीर पुतीन ६९ वर्षांचे असूनही ते फिट दिसतात. मध्यंतरी त्यांनी बर्फाने गोठलेल्या तलावात अंघोळ केली होती. लष्करी सरावांमध्ये भागदेखील हिरीहिरीने घेतात. ज्युडो, बॉक्सिंग, फुटबॉल, घोडेस्वारी, डायव्हिंग, हॉकी आणि बॅडमिंट, अशा खेळांमध्येही ते पटाईत आहेत.

Back to top button