ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्‍वराज्‍यासाठी लढले : फडणवीस | पुढारी

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्‍वराज्‍यासाठी लढले : फडणवीस

ठाणे, पुढारी ऑनलाईन : स्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांची आज जयंती. या निमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

यावेळी देवेंद्र फडणवीस ठाण्यातील शिवजयंती उत्सव, जांभळी नाका येथे बोलताना म्‍हणाले, सकल मराठा समाज्‍याच्या वतीने ठाण्यात हा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. मी त्‍यांचे सर्वांचे आभार मानतो. पुढे बोलताना ते म्‍हणाले, महिलांवर जुलमी अन्याय होत होता. हा अन्याय माँ जिजाबाई यांचे पुत्र छत्रपती शिवराय यांनी संपविला.

तसेच, औरंगजेब याचा दाखला देत फडणवीस म्‍हणाले, अफजलखानाने त्‍याच्या सेनापतीना विचारले ” कोण हैं शिवाजी” यावर सेनापती म्‍हणाले, आपल्‍याकडे खूप सैन्य आहे. दारूगोळा आहे. परंतु शिवाजी महराजांकडे असलेले सैन्य हे मातीसाठी लढतात आणि आपल्‍याकडील इमानासाठी लढतात. याच खूप मोठा फरक आहे.

महान युगपुरुषास जयंतीनिमित्त त्रिवार मुजरा!, अशा शब्दांत फडणवीसांनी शिवरायांना अभिवादन केले.

 

हे ही वाचलं का  

Back to top button