महाड तालुक्यात तलीये गावात दरड कोसळून ३६ जणांचा दुर्दैवी अंत | पुढारी

महाड तालुक्यात तलीये गावात दरड कोसळून ३६ जणांचा दुर्दैवी अंत

रायगड; पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई या गावातील घरांवर काल (ता.२३) सायंकाळी पाचच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत अंदाजे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ३० नागरिक ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

अजूनही NDRF तर्फे मदत पाठविण्यात येत आहे. सर्व ठिकाणी असलेल्या पुरामुळे मदत वेळेत मिळाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. लवकरात लवकर मदत मिळणार आहे.

या दुर्घटनेत मोठ्याप्रमाणात जीवित व आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गावाकडे जाणारा रस्ता खचल्याने अद्याप मदत पोहोचू शकलेली नाही.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडत आहेत. तर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शहरांना पुराचा वेढा पडला आहे. रायगड जिल्ह्यातही गेले दोन दिवस पावसाचा जोर कायम आहे.

गुरुवारी दिवसभर मुसळधार पावसाचा जोर कायम होता. जोरदार पावसामुळे घटनास्थळावर अद्याप कोणतीही मदत पोहचलेली नाही. पोलिस, स्थानिक प्रशासन व एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी पाठविण्यात आल्याचे रायगड प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ही दुर्घटना अजून मोठी असल्याचे बोलले जात आहे. अद्याप निश्चित किती लोक बेपत्ता असतील हे सांगितले जाऊ शकत नाही. दुर्घटनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button