Promise Day : 'प्रॉमिस डे'ला पाठवा हे शुभेच्छा संदेश | पुढारी

Promise Day : 'प्रॉमिस डे'ला पाठवा हे शुभेच्छा संदेश

व्हॅलेंटाईन वीक – डे5- प्रॉमिस डे (Promise Day)

आज व्हॅलेंटाईन वीकमधील पाचवा दिवस प्रॉमिस डे (Promise Day) म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी ११ फेब्रुवारीला हा दिवस प्रेमीयुगलकांकडून अनोख्या पद्धतीने आणि उत्साहात साजरा केला जातो. आजकाल नुसते प्रेमीयुगलकच नाही तर मित्र-मैत्रिणी, नवरा-बायको, प्रियजनही हा दिवस साजरा करतात.

Upcoming Movies : फेब्रुवारी महिन्यात मनोरंजनाचा ‘धमाका’; ‘हे’ चित्रपट हाेणार प्रदर्शित

कोणत्याही नात्यात विश्वासासोबत वचनबद्धताही (Promise Day) खूप म्हत्वाची आहे. कुटुंबातील व्यक्तींमध्ये असो, तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य एखाद्यासोबत व्यतीत करण्याचे ठरवत असता किंवा त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेत असतात. तेव्हा ही आयुष्यभराची नाती जोडली जातात.

Valentine Week : ‘रोज डे’ ते ‘व्हॅलेंटाईन डे’… प्रेम व्यक्त करण्याचा नवा ट्रेंड

ही नाती जोडत असताना त्यात प्रेम, जिव्हाळा आणि काळजीसोबत वचनबद्धताही (Promise Day) असली पाहिजे. तेव्हाच हे नाते फुलते, बहरते आणि समृद्धही होते. आजच्या दिवशी तुमच्या प्रियव्यक्तीला त्याच्या सुख-दु:खात सोबत राहण्याचे वचन द्या आणि आजचा प्रॉमिस डे उत्साहात साजरा करा.

‘प्रॉमिस डे’ शुभेच्छा 2022 – Happy Promise Day Wishes in Marathi

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ कधीही सोडणार नाही.
माझे वचन आहे तुला.
Happy Promise Day

 

आज स्वतालाच एक असं Promise करा की,
Life मध्ये कितीही नवीन Friend भेटले तरी,
जुन्या दोस्तांना कधी विसरायचं नाही…
Happy Promise Day

मला चंद्र आणि तारे आणून देण्याचं वचन नकोय,
तर कायम तू साथ देशील हेच वचन दे
Happy Promise Day

वचन निभावण्याचे वचन मी तुला देते
Happy Promise Day

 

 

 

हे ही वाचा :

Back to top button