कुमार बिस्वास महाराष्ट्र सदनाचे नवे निवासी आयुक्त | पुढारी

कुमार बिस्वास महाराष्ट्र सदनाचे नवे निवासी आयुक्त

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून समीर कुमार बिस्वास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.निरुपमा डांगे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. बिस्वास हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९० च्या तुकडीचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी असून केंद्रीय रसायने व खते मंत्रालयात ते अपर सचिव पदावर कार्यरत होते.

गेल्या सात वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर ते केंद्रात कार्यरत होते. मागील ३१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनामध्ये विविध महत्वाच्या पदावर कार्य केले आहे.

बिस्वास यांनी वर्ष २००० ते २०१२ पर्यंत महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे तसेच राज्य आर्थिक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक, जनगणनना प्रकल्पाचे संचालक आदी पदांवर कार्य केले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळात कार्यरत असतांना त्यांनी ‘मुंबई ट्रांस हर्बर लिंक’ सह अनेक महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीत उल्लेखनीय जबाबदारी पार पाडली आहे.

तर वर्ष २०१२ ते २०१४ या कालावधीत त्यांनी मुंबई येथील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button