ठाणे : कसारा गावात दरड कोसळून घरांचे नुकसान | पुढारी

ठाणे : कसारा गावात दरड कोसळून घरांचे नुकसान

कसारा ; शाम धुमाळ : शहापुर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ६ घरांवर डोंगरातील माती दरडींचा मलबा कोसळला. कसारा भागात घडलेल्या या घटनेने माळीणमध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुदैवाने ६ घरातील सर्व लोक बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी (दि.२१) मध्यरात्री पंचशील नगर, आनंदनगर, देऊळवाडी, निगडवाडी, शिवाजी नगर, तानाजी नगर परिसरात मोठ्या प्रमाणात घरांवर दरडी व मातीचा मलबा कोसळून नुकसान झाले.

तर या कोसळलेल्या मलब्यामुळे ६ घरे दडपली आहेत.घरातील लहान मोठे सर्व जण घराबाहेर पळाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही .

गॅस, अन्नधान्य, शालेय साहित्यासह महत्वाच्या वस्तुंची नासधूस झाली आहे. या घटनेची दखल परिसरातील आनंद नगर ,पंचशील नगर,देऊळवाडी,निंगडवाडी, ठाकुरवाडी ,कोळीपाडा,तानाजीनगर, या ठिकाणी डोंगर पोखरुन नव्याने वाड्या वस्त्या उभ्या राहिल्या आहेत.

डोंगर पोखरल्याने अनेक डोंगर टेकड्या कमकुवत झाल्याने भविष्यात अतिवृष्टी मुळे कसा-याचे माळीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याप्रकरणी. शहापुर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी वन जामिनीवर उभ्या राहिलेल्या धोकादायक घरांना घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात येणार असल्याची माहिती दिली.

दरम्यान कसारा गावातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी नियोजन नसल्याने घरांची धोकादायक निर्माण झाला आहे.

Back to top button