केआरके खान : राज कुंद्राला जगात पोर्नचे live streaming करायचे होते!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अश्लील सामग्री तयार केल्याबद्दल राज कुंद्राची खूपच खिल्ली उडविली जात आहे. या यादीमध्ये आता  केआरके खान देखील मागे नाही. त्याने ट्विट करून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर टीका केली आहे.

केआरकेने राज कुंद्राची उडवली खिल्ली

केआरके खान ने ट्विट करुन लिहिले आहे की, मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार राज कुंद्रा पॉर्न इंडस्ट्रीचा अनभिषिक्त राजा होण्याची योजना आखत होता. ते जगभरात पोर्नचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार होता. व्वा काय योजना आहे? कुंद्रा भैय्या जय हो. शिल्पा भाभी जय हो

कमल राशिद खानच्या या ट्विटला पाठिंबा देताना बरेच लोक राज कुंद्राला ट्रोल करत आहेत. शिल्पा शेट्टीवरही टीका होत आहे.
अश्लिल चित्रपट बनवून अॅपवर सोडल्याबद्दल राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.

तो 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत राहील. राज तुरूंगात गेल्यानंतर 9 वर्षांपूर्वी त्यांनी केलेले ट्विट व्हायरल होत आहे.

राज कुंद्राने ट्विट करुन लिहिले आहे की, ठीक आहे, चला पॉर्न विरुद्ध वेश्या व्यवसायाबद्दलही बोलूया. पैशासाठी कॅमेर्‍यावर सेक्स करणे कायदेशीर आहे? हे एकमेकांपेक्षा कसे वेगळे आहे ?? राज कुंद्राने हे ट्विट 29 मार्च 2012 रोजी केले होते. राज कुंद्रा Hotshots नावाचे अॅप चालवत असे.

राज कुंद्राची चॅटही समोर आली असून ती 10 नोव्हेंबर 2020 रोजीचे आहे. राज कुंद्रा सतत वादात अडकतो. पोलिसांना राजची जास्तीत जास्त दिवस कोठडी हवी होती पण कोर्टाने केवळ 3 दिवसांची कोठडी दिली.

कोर्टात राज कुंद्रा यांच्या वकिलांनी त्यांच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केले होते. राज कुंद्रा प्रकरणात अद्याप कुटूंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Back to top button