पृथ्वीजवळून जाणार आणखी एक लघुग्रह | पुढारी

पृथ्वीजवळून जाणार आणखी एक लघुग्रह

न्यूयॉर्क : पृथ्वीजवळून अनेक लघुग्रह पुढे जात असतात. अशा लघुग्रहांचा एक पट्टाच मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांदरम्यान असून त्याला ‘अ‍ॅस्टेरॉईड बेल्ट’ असे म्हटले जाते. आता 11 फेब्रुवारी लाही एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. या लघुग्रहाचा आकार एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षाही अतिशय मोठा आहे.

या लघुग्रहाला ‘138971 (2001 सीबी 21) असे नाव देण्यात आले आहे. त्याची रुंदी 4,265 फूट इतकी आहे. ‘नासा’ने पृथ्वीच्या जवळून जाणार्‍या लघुग्रहांच्या यादीत त्याला स्थान दिले आहे. तो पृथ्वीपासून 3 दशलक्ष मैल अंतरावरून जाणार असल्याने त्याच्यापासून अर्थातच पृथ्वीला कोणताही धोका नाही.

हा लघुग्रह 21 फेब्रुवारी  1900 मध्ये पहिल्यांदा दिसला होता. त्यावेळेपासून जवळजवळ दरवर्षी तो पाहिला जातो. यापूर्वी 18 फेब—ुवारी 2021 मध्ये तो पृथ्वीजवळून गेला होता. आता 11 फेब्रुवारीला व त्यानंतर 24 एप्रिलला तो पृथ्वीजवळून जाईल. त्यानंतर 2024 मध्ये जानेवारी, जून आणि पुन्हा डिसेंबरमध्ये तो दिसेल. ‘नासा’च्या गणनेनुसार हा लघुग्रह 11 ऑक्टोबर 2194 पर्यंत पृथ्वीची अशी ‘भेट’ घेत राहील.

Back to top button