धक्कादायक! चाकण एमआयडीसी मध्ये स्फोटकांनी एटीएम मशीन फोडले | पुढारी

धक्कादायक! चाकण एमआयडीसी मध्ये स्फोटकांनी एटीएम मशीन फोडले

चाकण; पुढारी वृत्तसेवा : चाकण एमआयडीसी मधील भांबोली हद्दीतील मुख्य रस्त्याच्या लगत असलेले एटीएम मशीन अज्ञातांनी स्फोट करून फोडले. चाकण एमआयडीसी मध्ये असलेल्या या एटीएममधील रक्कम चोरून नेली असून यात नेमकी किती रक्कम होती या बाबत महाळुंगे पोलिसांकडून तपास सुरु आहे. सदरची घटना बुधवारी (दि.२१) पहाटेच्या वेळी घडली आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार भांबोली (ता. खेड) गावाच्या हद्दीत मुख्य रस्त्यालगत हिताची कंपनीचे एटीएम आहे.

अधिक वाचा : 

मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास येथे आलेल्या अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएममधील पैसे काढण्यासाठी चोरट्यांनी स्फोट घडवून आणल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या स्फोटामध्ये एटीएम मशीनचे मोठे नुकसान झाले. स्फोट घडवून चोरट्यांनी मशीनमधील रोकड लंपास केली.

अधिक वाचा : 

घटनास्थळी महाळुंगे पोलिस व गुन्हे शाखा, श्वान पथक पाचारण करण्यात आले असून या बाबतचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

दरम्यान, संबंधित एटीएमवर सुरक्षारक्षक नेमलेला नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महाळुंगे पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचा :

कोरोना : देशात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नाही; केंद्र सरकारचा दावा

Sri Lanka vs India : दीपक चाहर ची झुंजार खेळी, भारताचा मालिका विजय

राजन गवस यांच्या मुलांच्या नावे बनावट अकाऊंट; अनेक मुलींना फसविले

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button