Kili and Neema paul : टांझानियन भावंड किली आणि नीमा पॉल यांचा भारतीय राष्ट्रगीताचा व्हिडिओ व्हायरल - पुढारी

Kili and Neema paul : टांझानियन भावंड किली आणि नीमा पॉल यांचा भारतीय राष्ट्रगीताचा व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Kili and Neema paul) टांझानियाचे किली पॉल आणि नीमा पॉल हे भाऊ बहिण सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. बॉलिवूडच्या गाण्यांवर रिल बनवून ते चर्चेत राहतात. बॉलिवूडच्या गाण्यांवरील त्या दोघांचे अनेक रिल्स व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा ते एका रिल्समुळे चर्चेत आले आहेत. किली पॉल आणि नीमा पॉल या दोघांनी भारतीयांना प्रजासत्ताकदिनामित्त एक वेगळे गिफ्ट दिले आहे.

त्यांचा नवा रिल हा ‘जन गण मन’ राष्ट्रगीताचा आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही भावंड छातीवर हात ठेवून भारताचे राष्ट्रगीत गाताना आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, “भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद.” (Kili and Neema paul)

व्हिडिओ शेअर केल्यानंतर या व्हिडिओने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आणि अनेक भारतीय त्यांचा देशाप्रती आदर व्यक्त करत असलेल्या या कृतीचे कौतुक करत आहेत. अनेकांनी भारताबद्दल आदर दाखवल्याबद्दल दोघांचे आभार मानले आहेत तर काहींनी टांझानियन भावंडांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.(Kili and Neema paul)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

किली पॉल आणि नीमा पॉल यांचा शेरशाहमधील प्रसिद्ध ‘रातन लांबियां’ गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांनी अलीकडेच पुष्पा मधील ‘ओ अंतवा’ वर रिल बनवला होता. हा रिलही व्हायरल झाला होता.

हेही वाचलत का?  

Back to top button