बकरी ईद निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा | पुढारी

बकरी ईद निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना बकरी ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी स्वत: याबाबतची माहिती देत एक ट्विट शेअर केले आहे. प्रशासनाने काेराेना संकटामुळे ईद साधेपणाने घरीच साजरी करण्याचे आवाहनही  केले आहे.

अधिक वाचा

आज बुधवारी (दि.२१) रोजी सर्वत्र कोरोना नियंमाचे पालन करत नागरिक बकरी ईद साजरी करत आहेत. आज सकाळपासूनच आपआपल्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला फोनद्वारे किंवा प्रत्येक भेटून ईदच्या शुभेच्छा देत आहेत. बकरी ईदच्या निमित्ताने सकाळीपासूनच मुस्लिम बांधवानी नमाज पठण करत आहेत.

अधिक वाचा

याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून देशातील सर्वच नागरिकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
याबाबतचे एक ट्विट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अधिक वाचा

या पोस्टसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “ईद-उल-अजहा’ च्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी आपल्याला सर्वसमावेशकता आणि समरसतेने साजरा व्हावा. याबाबत शुभेच्छा,’ असे म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा : कोल्हापूर : सह्याद्रीतील अनोख्या हिरव्या बेडकाची गोष्ट

Back to top button