Prithvi Shaw च्या खेळीनंतर कथित गर्लफ्रेंडचा मेसेज व्हायरल

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : श्रीलंका विरूद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने १३ धावांची खेळी केली. पण त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगली खेळी केली होती. पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) २४ चेंडूत ४२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात निराशा करणाऱ्या पृथ्वी शॉच्या कथित गर्लफ्रेंडची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाली आहे.

पृथ्वी शॉची आक्रमक फलंदाजी

पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने ५८ धावांची सलामीची भागीदारी केली होती. पृथ्वी शॉ याने पहिल्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करत २४ चेंडूत ४२ धावा केल्या आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून पुरस्कार मिळवला होता.

अधिक वाचा

rahul dravid यांनी चहरला असा संदेश पाठवला की भारताने सामनाच जिंकला

मिताली राज वन-डेमध्ये अव्वल

पृथ्वी शॉच्या खेळीवर कथित गर्लफ्रेंड फिदा

शॉची पहिल्या सामन्यातील खेळी पाहून त्याची कथित गर्लफ्रेंड प्राची हिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिने शॉच्या खेळीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

पृथ्वी शॉ
पृथ्वी शॉच्या धमाकेदार खेळीनंतर कथित गर्लफ्रेंडचा मेसेज

तिने इस्ट्राग्रामवर शॉचे दोन फोटो शेअर केले. एका फोटोला ‘द बेस्ट’ तर दुसऱ्या फोटो ‘वेल डिजर्वड’ अशी कॅप्शन दिली आहे.

प्राचीने शेअर केलेल्या दुसरा फोटोमध्ये पृथ्वीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

अधिक वाचा

टोकियो ऑलिम्पिक : पी. व्ही. सिंधू, मेरी कोमला विक्रमाची संधी

टोकियो ऑलिम्पिक पदकासाठी कोल्हापूरचे नेमबाज सज्ज

शॉच्या खेळीवर कोण काय म्हणाले?

माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तेंडुलकर, सेहवाग आणि लारा हे खेळाडू दिसत आहेत. ‘पहिल्या ५ षटकात आमचा जलवा’ असे सेहवागने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. कारण शॉची खेळी पाहता सेहवागला तेंडुलकर आणि लारा तसेच स्वतःच्या खेळीची आठवण आली.

सेहवागसोबत माजी भारतीय संघाचे प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी देखील कौतुक केले आहे. चॅपलने मेसेज करत शॉच्या खेळीवर आपले मत व्यक्त केले आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपक चहरच्या झुंजार ६९ धावांच्या जोरावर भारताने श्रीलंकेचे २७६ धावांचे आव्हान पार केले. भारताने दुसरा सामना जिंकून मालिकाही खिशात घातली.

हे वाचलंत का?

olympics2021; जाणून घेऊया ऑलिम्पिकचा इतिहास

ऑलिम्पिक बेड अँटी सेक्स, अमेरिकन धावपटूची टीका

किडनी च्या आरोग्यासाठी या पदार्थांचे सेवन झालेच पाहिजे

Back to top button