कोरोना रुग्‍ण मृत्‍यू संख्‍येत पुन्‍हा वाढ, 'कोरोनामुक्‍त'पेक्षा रुग्‍ण वाढ अधिक | पुढारी

कोरोना रुग्‍ण मृत्‍यू संख्‍येत पुन्‍हा वाढ, 'कोरोनामुक्‍त'पेक्षा रुग्‍ण वाढ अधिक

नवी दिल्ली;पुढारी ऑनलाईन : कोरोना रुग्‍ण मृत्‍यू संख्‍येत मागील २४ तासांमध्‍ये पुन्‍हा वाढ झाली. ३ हजार ९९८ कोरोना रुग्‍ण मृत्‍युमुखी पडले. तर ४२ हजार १५ नवे रुग्‍ण आढळले. एकीकडे कोरोना रुग्‍ण मृत्‍यू वाढले तर  ३६ हजार ९७७ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. कोरोनावर मात करणार्‍या रुग्‍णांपेक्षा पुन्‍हा कोरोनाबाधितांची संख्‍या वाढल्‍याने चिंता कायम राहिली आहे.

अधिक वाचा 

कोरोना संसर्ग दर हा २.२७ टक्‍के आहे. दिलासादायक बाब म्‍हणजे मागील ३० दिवसांपासून तो ३ टक्‍क्‍यांपेक्षा कमी रहिला आहे.
आतापर्यंत ३ कोटी १२ लाख १६ हजार ३३७ जण कोरोनाबाधित झाले. यातील ३ कोटी ३ लाख ९० हजार ६८७ रुग्‍ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ७ हजार १७० सक्रीय रुग्‍ण आहेत. आतापर्यंत ४ लाख १८ हजार ४८० जणांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. आतापर्यंत ४१ कोटी ५४ लाख ७२ हजार ४५५ जणांचे लसीकरण झाले आहे.

अधिक वाचा 

मृतांचा आकडा पुन्‍हा कसा वाढला?

देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच पुन्‍हा रुग्‍णसंख्‍या वाढताना दिसत आहे. मागील काही दिवस रुग्‍णवाढीचा आणि मृत्‍यू संख्‍येतील चढ-उतार सुरुच राहिला आहे. मंगळवारी ३० हजार ९३ नवे रुग्‍ण आढळले होते.तर ३७४ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला होता. मात्र बुधवारी पुन्‍हा मृत्‍यूसंख्‍येत वाढ झाली.

देशात अचानक मृत्‍यूसंख्‍येत झालेली वाढ ही महाराष्‍ट्राने मागील काही दिवसांपूर्वीचे कोरोना रुग्‍ण मृतांची संख्‍या आपल्‍या पोर्टलवर अपडेट केली. यामुळे ही रुग्‍ण मृत्‍यू संख्‍येत वाढ झाली आहे.

महाराष्‍ट्रात काही दिवसांपूर्वी १४७ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला होता. तसेच मागील ३५०९ रुग्‍णांचा मृत्‍यूची संख्‍या पोर्लटवर अपडेट करण्‍यात आली. त्‍यामुळे रुग्‍ण मृत्‍यूचा आकडा वाढला.

बिहारने ९ जून रोजी मृतांच्‍या संख्‍या अपडेट केल्‍याने रग्‍ण मृत्‍यूची आकडेवारी ६ हजार १३९ झाली होती.

आता महाराष्‍ट्राने रुग्‍ण मृत्‍यूची आकडेवारी वाढवल्‍याने देशातील रुग्‍ण मृत्‍यूच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे, अशी माहिती आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी दिली.

हेही वाचलं का? 

Back to top button