US Vs North Korea : उ. कोरियाकडून जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी | पुढारी

US Vs North Korea : उ. कोरियाकडून जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर कोरियाने (US Vs North Korea) पुन्हा एकदा जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी घेतली आहे. ही चाचणी गुरुवारी सकाळी घेण्यात आली आहे. उत्तर कोरियाकडून करण्यात आलेलं हे क्षेपणास्त्र परिक्षण छोटसं आहे. यापूर्वीही उत्तर कोरियाने या वर्षांतील पहिली क्षेपणास्त्र चाचणी ६ जानेवारीला घेतली होती. त्यानंतर ११ जानेवारीदेखील एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. तसेच १७ जानेवारीलादेखील शेवटची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केली होती.

अमेरिकेने उत्तर कोरियावर प्रतिबंध घालण्यासाठी संयुक्त राष्ट्राला विनंती केलेली होती. मात्र, चीन आणि रशियाने अमेरिकेच्या प्रयत्नांना पायबंद घातला. दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांचे गुप्त अधिकारी या चाचणीसंदर्भात विश्लेषण करत आहे, पण त्यांनाही याबद्दल विस्तारमध्ये माहिती उपलब्ध झालेले नाही.

उत्तर कोरियाने ६ दिवसांपूर्वी क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. ६ जानेवारीला जी क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती, तेव्हा ती हायपरसोनिक क्षेपणास्त्र चाचणी होती, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, दक्षिण कोरियाने या मताचा विरोध केला. पण, आता दक्षिण कोरियाच्या लष्कराने या माहितीची पुष्टी केलेली आहे की, उत्तर कोरिया आता हायपरसोनिक क्षेपणास्त्र उडविण्यास सक्षम झालेला आहे.

अमेरिकेने लावले होते निर्बंध 

अमेरिकेने मागील आठवड्यातच क्षेपणास्त्र चाचणीसाठी एकतर्फी निर्बंध लावले होते. या निर्बंधांतर्गत ६ उत्तर कोरियाई, एक रशिया आणि एक रशिया फर्म यांच्यावर चीन आणि रशियाकडून परिक्षणासाठी साहित्य खरेदी करण्यात आल्याचा आरोप करून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये घातलेले होते.

अमेरिकेला उत्तर कोरियाकडून वारंवार चॅलेंज 

उत्तर कोरिया अशाप्रकारे वारंवार क्षेपणास्त्र चाचणी घेत अमेरिकेला खुलं आव्हान देत आहे. खरंतर अमेरिका उत्तर कोरियावर निर्बंध घालण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर परमाणू कार्यक्रम बंद करण्यासाठी दबावदेखील टाकत आहे. आता उत्तर कोरियाने अशा पद्धतीची चाचण्या करून हे स्पष्ट केलं आहे की, अमेरिकेच्या निर्बंधांना आणि दबावाला उत्तर कोरिया घाबरणार नाही.

Back to top button