प. बंगाल : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्यांनी नाकारला ‘पद्म’ पुरस्कार | पुढारी

प. बंगाल : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्यांनी नाकारला 'पद्म' पुरस्कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प. बंगाल या राज्याचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार नाकाराला आहे. त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं आहे की, “मला हा पुरस्कार देण्यात येणार आहे, याची कोणतीच कल्पना नव्हती. त्यासंदर्भात कुणीही माहिती दिली नाही. जर खरंच पद्मविभूष हा पुरस्कार मला देण्याची घोषणा करण्यात आली असेल तर, मी त्याचा स्वीकार करत नाही.”

विशेष बाब ही आहे की, त्या पद्म पुरस्कारांच्या यादीत बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासहीत गुलाम नबी आजाद यांचंही नाव आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनाही मरणोत्तरीय पद्म विभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. प. बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टीचे बुद्धदेव भट्टाचार्य यांनी मंगळवारी ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार नाकारला आहे.

बुद्धदेव भट्टाचार्य हे २००० ते २०११ पर्यंत प. बंगाल या राज्याचे मुख्यमंत्री होते. ते जादवपूर विधानसभा मतदार संघातून सलग २४ वर्षे निवडून आले होते. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या पोलिट ब्युरोचे सदस्य होते. तृणमूल काॅंग्रेसची सत्ता येण्याअगोदर भट्टाचार्य मुख्यमंत्री होते. सिंगूर आणि नंदीग्राम यांसारख्या आंदोलनामुळे त्यांना सत्ता गमवावी लागली होती.

‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळणाऱ्यांच्या यादीत १७ जणांची नावे होती. त्यात केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांचेही नाव सर्वांत वर होते. सार्वजनिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही याच क्षेत्रातील योगदानामुळ हा पुरस्कार देण्यात आला होता. दरम्यान, काॅंग्रेसचे नेते आणि केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी एक उपरोधिक ट्विट चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यांनी म्हंटलं आहे की, “सही काम किया. वो गुलाम नही आझाद रहना चाहते है”

Back to top button