Ola Electric Car : इलेक्ट्रिक स्कूटर नंतर आता ओला इलेक्ट्रिक कार येणार, सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिले संकेत | पुढारी

Ola Electric Car : इलेक्ट्रिक स्कूटर नंतर आता ओला इलेक्ट्रिक कार येणार, सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिले संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क

ओला इलेक्ट्रिक  (Ola Electric) चे सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी, ओला स्कूटर नंतर आता कंपनी इलेक्ट्रिक कार (Ola Electric Car) आणण्याची तयारी करत असल्याचे संकेत दिले आहेत. भाविश यांनी ट्विटरवर एका युजरच्या ट्विटला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. त्यात त्यांच्या इलेक्ट्रिक व्हीकल (EV) कलेक्शनचा फोटो पोस्ट केला आहे.

यूजरने ट्विटमध्ये लिहिले, ”आता BLACK EV FAMILY पूर्ण झाली आहे.” त्यावर Ola च्या सीईओंनी, ”पुढील कार इलेक्ट्रिक कार (Ola Electric Car) असायला हवी,” असे उत्तर दिले आहे. या फोटोत ओला इलेक्ट्रिक S1 स्कूटर दिसत आहे.

अग्रवाल यांच्या ट्विटवरुन इलेक्ट्रिक कार नंतर आता कंपनी इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी करत असल्याचे समजते. ऑगस्ट २०२१ मध्ये अग्रवाल यांनी एका यूजरकडे ट्विटरद्वारे संवाद साधताना ओला २०२३ पर्यंत इलेक्ट्रिक फोर-व्हिलर इंडस्ट्रीत उतरण्याचा प्रयत्न करत असल्याची पुष्टी केली होती.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर लाँच दरम्यान एका यूजरने अग्रवाल यांनी विचारले होते की तुमच्याकडे पेट्रोल, डिझेल की इलेक्ट्रिक कोणती कार आहे?. त्यावर त्यांनी उत्तर दिले होते, ”२ महिन्यांपूर्वी कोणत्याही कारचा मालक नव्हतो. आता एक हायब्रिड कार आहे. २०२३ मध्ये इलेक्ट्रिक कार असेल. ओलाची इलेक्ट्रिक कार.”

ओला इलेक्ट्रिकने जुलै २०२१ मध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरची प्री-लाँच बुकिंग ४९९ रुपयांत उपलब्ध करुन दिली होती. त्यानंतर केवळ २४ तासांत १ लाख ऑर्डर आल्या होत्या. ओलाच्या स्कूटर १० रंगांमध्ये इन-हाउस विकसित ८.५ KW मोटर आणि ३.९७ kWh बॅटरी पॅक सोबत येतात. ओला इलेक्ट्रिक S1 आणि S1 प्रो ची किंमत अनुक्रमे ९९,९९९ रुपये आणि १,२९,९९९ रुपये आहे. ई-स्कूटरची डिलिव्हरीला विलंब झाल्यानंतर ओला इलेक्ट्रिकने १६ डिसेंबर २०२१ रोजी डिलिव्हरी सुरु केली होती.

Ola S1 स्कूटर फुल सिंगल चार्जवर १२१ किलोमीटरपर्यंत चालवू शकता. तर S1 Pro एकावेळी चार्ज केल्यावर १८१ किलोमीटरपर्यंत धावते. S1 केवळ ३.६ सेकंदात ०-४० किेलोमीटर प्रति तास स्पीड घेते. तर एस १ प्रो ३ सेकंदात ०-४० किलोमीटर प्रति तास वेगाने धावते.

Ola Electric स्कूटर : काय आहे किंमत

ओला इलेक्ट्रिक स्कूटर एस १ ची भारतीय बाजारातील एक्स-शोरुम किंमत ९९,९९९ रुपये आहे. तर एस १ प्रो ची एक्स-शोरुम किंमत १,२९,९९९ रुपये आहे. Ola S1 मध्ये २.९८ kWh आणि S1 Pro मध्ये ३.९७ kWh बॅटरी पॅक दिले आहेत.

Back to top button