Kolhapur Tourism : जिल्ह्यातील पर्यटनस्थळे २६ जानेवारीपासून सुरू - पुढारी

Kolhapur Tourism : जिल्ह्यातील पर्यटनस्थळे २६ जानेवारीपासून सुरू

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Tourism – जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे बुधवा, दि. 26 पासून नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रात्री आदेश काढले. (Kolhapur Tourism)

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या नव्या निर्बंधांनुसार ऐतिहासिक किल्‍ले आणि पर्यटनस्थळांवर नागरिकांना बंदी घालण्यात आली होती. त्यानुसार दि. 10 जानेवारीपासून कोल्हापूर जिल्ह्यातील किल्‍ले आणि पर्यटनस्थळांवर बंदी होती. पर्यटनस्थळांवर कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. गर्दी होणार नाही, याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला घ्यावी लागणार आहे.

Back to top button