धक्कादायक! अवघ्या काही वर्षांनी पृथ्वी नष्ट होणार अन् मनुष्य… | पुढारी

धक्कादायक! अवघ्या काही वर्षांनी पृथ्वी नष्ट होणार अन् मनुष्य...

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगात दिवसेंदिवस नवनव्या आपत्ती येत आहेत. या आपत्तींना घेऊन वेळोवेळी शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी धक्कादायक इशारादेखील दिला आहे. याच दरम्यान शास्त्रज्ञांनी पृथ्वी लवकर नष्ट होणार असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर, पृथ्वी नष्ट होणार आणि ती कधी नष्ट होणार, याचंही भाकीत त्यांनी केलं आहे.

शास्त्रज्ञांनी असं सांगितलं आहे की, “सुर्यामुळे पृथ्वी नष्ट होणार आहे. काही वर्षांनंतर सुर्य फुटणार आहे. ज्याच्यामुळे पृथ्वीसहीत संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होणार आहे ” खूप संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, “सूर्य सध्या तारुण्यावस्थेत आहे. पण, पाच अब्ज वर्षांनंतर सूर्याचा विस्फोट होणार आणि पृथ्वीही नष्ट होणार आहे.”

शास्त्रज्ञांनी हा धक्कादायक इशारा देत असताना अनेक खुलासे केले आहेत. खगोल शास्त्रज्ञ पाओलो टेस्टा म्हणतात की, “सुर्याचे वय ५ अब्ज वर्षांपेक्षा थोडे कमी आहे. सूर्य हा मध्यममार्ग तारा आहे. संशोधनानुसार सुर्याचे एकूण आयुष्य १० अब्ज वर्षांपेक्षा जास्त असू शकते.” सुर्यावरील हायड्रोजनचा थर काम करणं थांबविणार आहे. पण, हे ५ अब्ज वर्षांनंतर होणार आहे.

यामुळे सुर्यामधून निघणारे तापमान उत्पन्न होणार नाही, त्यामुळे ब्रह्मांडांतील इतर ग्रह थंड पडतील. सुर्याचे शेजारी असणारे बुध आणि शुक्र नष्ट होती. त्याचबरोबर पृथ्वीदेखील नष्ट होऊन जाईल. नासाने सांगितल्याप्रमाणे जितका मोठा ग्रह तितकं त्याचं आयुष्य कमी असते. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, सुर्याचा अंत झाला की, समुद्र आटून जातील आणि मनुष्य नष्ट होऊन जातील.

Back to top button