ICC T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी आहे भारत विरुध्द पाकिस्तान सामना | पुढारी

ICC T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी आहे भारत विरुध्द पाकिस्तान सामना

पुढारी ऑनलाईन डेस्क : (ICC T20 World Cup 2022) आयसीसीने टी20 वर्ल्ड कप २०२२ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. भारताला सुपर १२ मध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश सोबत ठेवले आहे. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडचे चार संघ १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या लेगसाठी पात्र ठरण्यासाठी आमनेसामने असतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर १२ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याचवेळी, भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी MCG येथे पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. टी20 विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत.

भारत स्पर्धेत एकुण पाच सामने खेळणार आहे. पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुध्द, तर दुसरा सामना २७ ऑक्टोबरला ग्रुप ए च्या रनर अप सोबत, तिसरा सामना ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरोधात तर चौथा सामना २ नोव्हेबरला ग्रुप बीच्या विजयी झालेल्या टीम सोबत होणार आहे. (ICC T20 World Cup 2022)

(ICC T20 World Cup 2022) टी20 वर्ल्ड कपचे सामने सात ठिकाणी होणार आहेत. एडिलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी मध्ये होणार आहेत. टी20 वर्ल्ड कपचा फायनल सामना १३ नोव्हेबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. तर सेमी फायनल ९ आणि १० नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंड आणि एडिलेड मध्ये होणार आहे.

त्याचबरोबर विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांची विक्री ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, या काळात कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करावे लागणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेची ही आठवी आवृत्ती असेल. ICC T20 विश्वचषक २००७ मध्ये सुरु झाला होता. महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली भारताने ही ट्रॉफी जिंकली होती. यावेळी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे. (ICC T20 World Cup 2022)

हेही वाचलत का?

Back to top button