Sania Mirza : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा | पुढारी

Sania Mirza : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza Retirement) निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी आलेल्या सानियाने 2022 हा तिचा शेवटचा हंगाम असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच यावर्षी ती शेवटच्या वेळी कोर्टवर दिसणार आहे. बुधवारी तिला महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

युक्रेनच्या नादिया किचेनोक यांना स्लोव्हेनियाच्या तमारा झिदानेक आणि काजा जुवान यांनी ४-६, ६-७(५) ने पराभूत केले. अशाप्रकारे महिला दुहेरीच्या पहिल्या सामन्यात ती पराभूत झाल्यानंतर बाहेर पडली. मात्र, सानिया आता ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीचा सामना खेळेल.

सानिया मिर्झाने म्हटलं की, २०२२ माझा शेवटचा हंगाम असणार आहे. मी आठवडाभर तयारी करत आहे, पण मी पुढे पूर्ण हंगाम खेळू शकेन की नाही याची खात्री नाही. पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर सानिया म्हणाली की, मला वाटते की मी अधिक चांगले खेळू शकते, पण आता शरीर साथ देत नाही. हे माझ्यासाठी सर्वात मोठे दु:ख आहे.

सानिया मिर्झाने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, २०१५ मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपन जिंकले. त्याचबरोबर मिश्र दुहेरीत तिने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, २०१२ मध्ये फ्रेंच ओपन आणि २०१४ मध्ये यूएस ओपन जिंकली आहे.

२००३ मध्ये केली करिअरला सुरुवात

३५ वर्षीय सानियाने २००३ मध्ये टेनिसमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.  १९ वर्षे ती अविरत टेनिस खेळत असून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने भारताला विजय मिळवून दिला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button