तीव्र भूकंपांमुळे कच्छच्या भूदृश्यांमध्ये झाले बदल - पुढारी

तीव्र भूकंपांमुळे कच्छच्या भूदृश्यांमध्ये झाले बदल

वडोदरा : तीव— भूकंपाच्या घटनांमुळे गुजरातच्या कच्छ क्षेत्रातील कटरोल हिल फॉल्टच्या भूद़ृश्यांमध्ये असामान्य बदल घडलेले असल्याचा छडा आता भारतीय संशोधकांनी लावला आहे. गेल्या तीस हजार वर्षांच्या अवधीमध्ये अनेक तीव— भूकंप या क्षेत्रात येऊन गेले. हेच भूकंप येथील भूद़ृश्यांमधील बदलांसाठी जबाबदार आहेत. याबाबत वडोदरा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या भूवैज्ञानिकांनी संशोधन केले आहे.

या फॉल्टच्या भूकंपीय इतिहासाबाबतचे आश्चर्यकारक तथ्य समोर आल्यानंतर भूकंपाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आता नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. औद्योगिक क्षेत्र तसेच भूज शहरासह अनेक प्रमुख वसाहतींजवळ असल्याने कच्छ बेसिनमध्ये या संशोधनानंतर एक संशोधित भूकंपीय जोखिम मूल्यांकन तसेच योग्य रणनीती गरजेची बनलेली आहे.

कच्छ क्षेत्रातील भूकंपीय जटिलता अत्याधिक आहे. पूर्व-पश्चिम ट्रेंडिंग फॉल्ट लाईन्सच्या रुपात विभिन्न भुकंपीय स्रोतांची विशेषता याच्या कारणांमध्ये समाविष्ट आहे, जी संचित टेक्टोनिक तणाव निर्माण करते. 2001 मध्ये भूजमध्ये आलेल्या विनाशकारी भुकंपानंतर तिथे सातत्याने निगराणी केली जाते. त्यामधून तेथील अधिकांश फॉल्ट जसे ‘कच्छ मेनलँड फॉल्ट, दक्षिण वागड फॉल्ट, गेडी फॉल्ट आणि आयलंड बेल्ट फॉल्ट भूकंपीय रुपाने सक्रिय आहे.

हेही वाचलत का?

Back to top button