Trump Assassination Attempt
हल्‍लेखोर रायन वेस्ली रुथ, दुसर्‍या छायाचित्रात .(Image source- X)

ट्रम्‍प यांच्‍यावर गाेळीबाराचा प्रयत्‍न करणारा रायन रुथ आहे तरी कोण?

Trump Assassination Attempt : फ्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्‍यावर गोळीबार
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा प्राणघातक हल्‍ल्‍यातून थोडक्‍यात बचावले आहेत. हल्‍लेखोर रायन वेस्ली रुथ ( वय ५८ ) याने रविवारी ( दि. १५ सप्टेंबर) फ्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्‍यावर २५० ते ३०० मीटर अंतरावरुन गोळीबाराचा प्रयत्‍न केला. ट्रम्प वेस्ट पाम बीच येथील गोल्फ क्लबमध्ये गोल्फ खेळत असताना त्‍याने हा हल्‍ला केला. या हल्‍ल्‍यातून ट्रम्‍प बचावले. रुथ याला अटक करण्यात आली आहे. (Trump Assassination Attempt)

याआधी जुलैमध्ये पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका प्रचार रॅलीमध्ये एका शूटरने ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. बंदुकधारी व्यक्तीने ट्रम्प यांच्या कानात गोळी झाडली, या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्यू झाला होता. तर दोन जण जखमी झाले. यानंतर पुन्‍हा एकदा ट्रम्‍प यांच्‍यावर जीवघेणा हल्‍ला झाल्‍याने अमेरिकेत खळबळ माजली आहे.

Trump Assassination Attempt : कोण आहे रायन रुथ ?

'न्यूयॉर्क टाईम्स'च्या रिपोर्टनुसार, रायन वेस्ली राउथ हा उत्तर कॅरोलिना येथील ग्रीन्सबोरो येथे बांधकाम कामगार म्‍हणून काम करत असे. त्याने नॉर्थ कॅरोलिना कृषी आणि तांत्रिक राज्य विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. 2018 च्या सुमारास हवाई येथे तो स्‍थलांतरित झाला. रशियाने युक्रेनवर केलेल्‍या हल्‍ल्‍यानंतर युक्रेन युद्धात सहभागी होण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. यापूवी त्‍याने केलेल्‍या एक्स पोस्टमध्ये, युक्रेनचा खंबीर समर्थक असल्याचा दावाही केला होता. रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात लढण्यासाठी त्याने कीवला गेल्याचे सांगितले होते. रुथ याने युक्रेनमध्ये 'लढा आणि मरण्याची' इच्छा व्यक्त केली. मी क्राकोला जाण्यासाठी आणि युक्रेनच्या सीमेवर स्वयंसेवक म्हणून लढण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार आहे, असल्‍याचेही त्‍याने या पोस्‍टमध्‍ये म्‍टहलं होतं.

रायन युक्रेन समर्थक

न्यूजवीक रोमानियाला दिलेल्या मुलाखतीत, रुथ म्हणाला होता की, " सुरुवातीला युक्रेनियन लोकांना पाठिंबा देण्यासाठी लढण्यासाठी तो युक्रेनला गेला होता. युक्रेनची राजधानी कीव्‍हामध्ये आल्यानंतर त्याने युद्धात लोकांना भरती करण्यासाठी त्‍याने मदत केली होती. 2002 मध्ये त्याला ग्रीन्सबोरो येथील एका इमारतीत शस्त्रासह बॅरिकेडिंग केल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. या प्रकरणाचा निकाल अद्याप अस्पष्ट आहे. रुथच्या मुलाने 'डेली मेल'ला सांगितले की, माझे वडील अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तिरस्कार करतात. तसेच ते हिंसाचाराचे समर्थन करत नाहीत, असा दावाही त्‍याने केला आहे.

रायन रुथ याने अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांचे समर्थन केले हाेते. "अमेरिकेची लोकशाही आणि स्वातंत्र्य" जपण्यासाठी त्यांची मोहीम केंद्रीत करण्याचे आवाहन केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी "अमेरिकनांना एका मालकाच्या हाताखाली गुलाम बनवण्याचा" प्रयत्न केल्याचा आरोप त्याने केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news