बेरूत : पुढारी ऑनलाईन
लेबनॉनमध्ये इस्रायलकडून मोठे हवाई हल्ले केले जात आहेत. या दरम्यान दक्षिण-पूर्व लेबनॉन मध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात तीन मीडिया कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनची सरकारी 'नॅशनल न्यूज एजन्सी' ने आज (शुक्रवार) या विषयी माहिती दिली आहे. बेरूत स्थित 'अल-मायादीन टीवी' ने सांगितले की, आज शुक्रवार सकाळी हल्ल्यात मारल्या गेलेल्या पत्रकारांमध्ये त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 'अल-मायादीन' ने सांगितले की, इस्रायलच्या हल्ल्यात कॅमेरा ऑपरेटर गस्सान नजर आणि प्रसारण टेक्नीशीयन मोहम्मद रिदा या दोघांचा मृत्यू झाला. (Israel Hezbollah War)
लेबनॉनच्या हिजबुल्लाह समूहाच्या 'अल मनार टीव्ही' ने सांगितले की, झालेल्या हवाई हल्ल्यात कॅमेरा ऑपरेटर विसम कासिम हसबायाचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित पत्रकाराने सांगितले की, ज्या घरामध्ये हे लोक झोपले होते त्याला लक्ष्य करण्यात आले.
इस्रायली सैन्याकडून सांगण्यात आले की, यामध्ये हमासचा कमांडर मोहम्मद अबू इतिवी मारला गेला. अबू इतिवी इस्रायली नागरिकांच्या हत्या आणि अपहरणामध्ये सामिल होता. अबू इतिवी हा हमासच्या सेंट्रल कॅम्प ब्रिगेडच्या अल-बुरीज बटालियनमध्ये नुखबा कमांडर होता आणि तो UNRWA (युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी) चा कर्मचारी होता, असेही लष्कराने म्हटले आहे.