पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशातील हिसांचारामुळे पंतप्रधान हसीना शेख यांनी राजीनामा दिला. यानंतर त्यांनी भारतात पलायन केले आहे. मात्र, या घटनेनंतर बांगलादेशाचे प्रतिनिधित्व कोण करणार याकडे सर्वाच्या नजरा लागून राहिल्या होत्या. आता याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशच्या लष्करप्रमुखांची याबाबतची घोषणा करत सलीमुल्ला खान हे आता बांगलादेशाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले.
बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी सोमवारी (दि.5) सलीमुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. खान हे एक अग्रगण्य शैक्षणिक आणि सार्वजनिक विचारवंत आहेत. या अस्थिर काळात एक केंद्रीय व्यक्तिमत्व म्हणून ते उदयास आले आहेत. राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरील टीकात्मक भूमिकेसाठी ओळखले ते ओळखले जातात. खान यांनी निदर्शनांदरम्यान कथित राज्य-प्रायोजित हत्येची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. विश्वासार्ह तपासाची त्यांची मागणी देशांतर्गत तपासाच्या पारदर्शकता आणि निष्पक्षतेबद्दल वाढत्या चिंता दर्शवते. त्याच्या नेतृत्वात आता बांगलादेशातील हिसांचार आटोक्यात येतो का? या कडे सर्वांचे लक्ष असणार आहे.