सुराज्य, समृद्ध भारतासाठी जीवन समर्पित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; प्रवासी भारतीयांकडून मोदी-मोदीचा गजर
Prime Minister Narendra Modi interacted with the Indian community at an event
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांनी भारतीय समुदायासोबत एका कार्यक्रमात संवाद साधला. या सभेला मोठी गदी लोटली होती. Pudhari File Photo
Published on
Updated on

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी आजवरचा देशातील पहिला पंतप्रधान आहे. मी स्वातंत्र्यासाठी लढू शकलो नाही, मरू शकलो नाही, याचे मला शल्यही होते... मी स्वराज्यासाठी मरू शकलो नाही, पण सुराज्य आणि समृद्ध भारतासाठी मी जगू शकतो, हा ध्यास घेतला आणि माझे हे जीवन केवळ त्यासाठीच समर्पित केले, असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले.

न्यूयॉर्क येथील नासाऊ वेटरन्स कॉलेजियममध्ये रविवारी ‘मोदी अँड अमेरिका प्रोग्रेस टुगेदर’ शीर्षकांतर्गत झालेल्या भव्य समारंभात ते बोलत होते. समारंभासाठी 25 हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली होती. पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताची लोकशाही ही जगातील सर्वांत जिवंत लोकशाही आहे. या जिवंत लोकशाहीने मला तिसर्‍या कार्यकाळाची संधी दिलेली आहे. आम्हाला मोठी उद्दिष्टे गाठायची आहेत. तीन पट शक्ती आणि तीन पट वेगाने आम्हाला पुढे जायचे आहे, असा संकल्प पंतप्रधानांनी बोलून दाखवला.

भारतात शेकडो भाषा आहेत, जगातील सारे पंथ-संप्रदाय भारतात आहेत, तरीही एक होऊन आम्ही पुढे चाललो आहोत. इथेच या सभागृहात बघा कुणी तमिळ, कुणी तेलगू, कुणी मल्याळम, कुणी कन्नड, कुणी पंजाबी, कुणी मराठी, कुणी गुजराती आहे. भाषा अनेक आहेत, पण भाव एकच आहे... आणि तो आहे... भारतमाता की जय... जगासोबत जुळवून घेताना या वैविध्याचा आम्हाला मोठा उपयोग होतो. आम्ही कधीही एककल्ली नसतो. वैविध्यातील एैक्याचे हेच मूल्य आम्हाला सहजगत्या विश्वबंधू बनवून सोडते. कुठल्याही देशात आम्ही असलो तरी आमची ही भावना बदलत नाही. आम्ही ज्या समाजात राहातो, त्या समाजाचे पांग फेडतो. अमेरिकेच्या विविध क्षेत्रांत भारतीयांनी आपला जो झेंडा रोवला आहे, तो याच बळावर, असे त्यांनी बोलून दाखवले. टी-20 वर्ल्ड कप अमेरिकेत नुकताच झाला. अमेरिकेचा संघ छान खेळला. या संघातही इथल्या भारतीयांचा सहभाग जगाने पाहिला, त्याचाही आवर्जून उल्लेख पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधान म्हणाले, मी ज्या देशात जातो, त्या देशाचे नेते भारतीयांचे कौतुक करतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन मला त्यांच्या घरी घेऊन गेले. खूप मान दिला. हा मान 140 कोटी भारतीयांचा आहे. अमेरिकेतील तुम्हा सर्व भारतीयांचा आहे. तुमच्या पुरुषार्थाचा आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. नमस्ते यूएस म्हणून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. नमस्ते ही आपली अभिवादनाची पद्धत केवळ तुमच्यामुळे मल्टीनॅशनल झाली आहे. मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नसतानाही वरचेवर अमेरिकेत येत असे. पंतप्रधान असताना 2014, 2015, 2019, 2023 आणि आता 2024 मध्ये मी अमेरिकेत आलो. प्रत्येक वेळी गर्दीचे मागील विक्रम तुम्ही मोडून काढले.

इंडो पॅसिफिक देशांच्या सहकार्यासाठी क्वाड कायम

विल्मिंग्टन; अनिल टाकळकर : इंडो पॅसिफिक देशांना मदत करण्यासाठी, भागीदारी करण्यासाठी क्वाडचे अस्तित्व यापुढेही कायम राहील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत व्यक्त केला. क्वाडमधील आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि जागतिक हितासाठी क्वाडला बळकट करण्यासाठी वैयक्तिक वचनबद्दतेबद्दल अध्यक्ष बायडेन यांचे आभार मानले. मोदी म्हणाले, ज्या वेळी जग तणाव आणि संघर्षाने ग्रासले आहे, अशा वेळी क्वाड भागीदारांचे, सामायिक लोकशाही नैतिकता आणि मूल्ये यांच्यासह एकत्र येणे मानवतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. कायद्याचे राज्य, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर आणि विवादांचे शांततापूर्ण निराकरण करण्याच्या वचनबद्धतेवर आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था राखण्यासाठी हा गट उभा आहे यावर त्यांनी भर दिला.

भारत-अमेरिकेत हे करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या दरम्यान महत्त्वपूर्ण करार झाले. याअंतर्गत अमेरिकन अंतराळ क्षेत्राकडून भारतात सेमिकन्डक्टर प्लान्ट उभारला जाणार आहे.

भारतात तयार होणार्‍या या सेमिकन्डक्टर चिप्सचा वापर अमेरिकन तसेच भारतीय सशस्त्र दलांसाठी करण्यात येईल.

अमेरिकेने भारताला 31 एमक्यू-बी ड्रोन देण्याची घोषणा केली आहे. सीमेवर टेहळणीसाठी या ड्रोनचा वापर भारताकडून करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news