NASA च्या 'बोइंग स्टारलाइनर'चा परतीचा प्रवास सुरू

boeing starliner return | 'सुनीता विल्यम्स, बॅरी विल्मोर'शिवाय पृथ्वीवर परतणार
NASA's 'Boeing Starliner' begins its return journey
NASA च्या 'बोइंग स्टारलाइनर'चा परतीचा प्रवास सुरूPudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: नासाचे बोइंग स्टारलाइनर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांच्याशिवाय परतीचा प्रवास करणार आहे. ते आज (दि.६ सप्टें) अंतराळ स्थानकावरून परतीच्या प्रवासासाठी निघाले असून, शनिवारी (दि.७ सप्टें) न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स स्पेस हार्बर येथे उतरणार आहे. दरम्यान NASA च्या 'बोइंग स्टारलाइनर' क्रूशिवाय स्टेशनवरून पृथ्वीवर परत येत असल्याची महत्त्वाची अपडेट 'नासा'ने दिली आहे.

अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी, NASA ने 24 ऑगस्ट रोजी घोषणा केली की स्टारलाइनर क्रूशिवाय स्टेशनवरून पृथ्वीवर परत येईल. यानुसार सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना अंतराळ स्थानकात घेऊन गेलेले बोइंग स्टारलाइनरचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्याने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून शुक्रवारी (दि.६ सप्टें) अनडॉक केले असून, शनिवारी (दि.७ सप्टेंबर) दुपारपर्यंत न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स स्पेस हार्बर येथे उतरणार असल्याचे देखील नासाकडून सांगितले आहे.

केवळ आठवड्याची मोहीम, अनिश्चित काळासाठी लांबली

बोईंगचे स्टारलाइनर अंतराळयान आज पृथ्वीवर परतण्यासाठी सज्ज झाले आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांच्यासह चाचणी उड्डाण करणारे हे अभियान 5 जून रोजी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल स्पेस फोर्स स्टेशन येथील स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स 41 वरून प्रक्षेपित करण्यात आले. सुरुवातीला आठ दिवसांची मोहीम म्हणून नियोजित, हेलियम गळतीमुळे आणि अंतराळ यानातील थ्रस्टर निकामी झाल्यामुळे त्यांचा मुक्काम अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आला.

स्टारलाइनर मोहीम का आहे महत्त्वाची?

स्टारलाइनर मोहीम बोईंगसाठी महत्त्वाची होती, कारण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) क्रू पाठवण्यामध्ये त्याच्या व्यावसायिक स्पेस कॅप्सूलची क्षमता प्रदर्शित करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. तथापि, बोईंगला मोठा धक्का बसला, नासाने २५ ऑगस्ट रोजी घोषणा केली की फेब्रुवारी २०२५ च्या सुरुवातीला अंतराळवीर एलोन मस्कच्या स्पेसएक्स क्रू ड्रॅगनवर पृथ्वीवर परत येतील.

सुनीता विल्यम्स, बॅरी विल्मोर यांच्या परतीसाठी 'क्रू-९ मिशन'

केवळ एक आठवड्यांसाठी गेलेल्या विल्यम्स आणि त्यांचे सहकारी दोन महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) आहेत. बोईंग स्टारलाइनरमधील खराबीमुळे, दोन अंतराळवीरांचे परतणे फेब्रुवारी २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. हेलियम गळती आणि थ्रस्टर निकामी झाल्यामुळे तो परत येऊ शकले नाहीत. आता सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना एलोन मस्कच्या कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलद्वारे परत आणले जाईल. क्रू-९ मिशन २४ सप्टेंबर २०२४ रोजी लाँच केले जाईल.

क्रू-९ अंतराळ मोहीम काय आहे?

क्रू-९ मिशनमध्ये चार अंतराळवीर जाणार होते, मात्र आता केवळ दोनच अंतराळवीर जाणार आहेत. याचे कारण म्हणजे सुनीता आणि त्यांचे सहकारी यांना परत येताना परत आणता येईल. त्यामुळे या दोन अंतराळवीरांना रोखण्यात आले असून, पुढील मोहिमेत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. मिशनचे कमांडर जेना कार्डमन, पायलट निक हेग, मिशन स्पेशालिस्ट स्टेफनी विल्सन आणि रशियन कॉस्मोनॉट मिशन स्पेशालिस्ट अलेक्झांडर गोर्बुनोव यांच्यासोबत जाण्याची सुरुवातीची योजना होती. आता रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव आणि पायलट निक हेग हे दोनच पुरुष अंतराळवीर तेथे जातील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news