पुढारी ऑनलाईन डेस्क : नासाची भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बॅरी विल्मोर फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर परतणार आहेत. दोन्ही अंतराळवीर दोन महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) आहेत. आता सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना एलोन मस्कच्या कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलद्वारे परत आणले जाईल.
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी यांनी ५ जून रोजी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानातून तिसऱ्यांदा अंतराळात यशस्वी उड्डाण केले. केवळ एक आठवड्यांसाठी गेलेल्या विल्यम्स आणि त्यांचे सहकारी दोन महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) आहेत. बोईंग स्टारलाइनरमधील खराबीमुळे, दोन अंतराळवीरांचे परतणे फेब्रुवारी २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. हेलियम गळती आणि थ्रस्टर निकामी झाल्यामुळे तो परत येऊ शकले नाहीत. आता सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना एलोन मस्कच्या कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलद्वारे परत आणले जाईल. क्रू-९ मिशन २४ सप्टेंबर २०२४ रोजी लाँच केले जाईल.
क्रू-९ मिशनमध्ये चार अंतराळवीर जाणार होते, मात्र आता केवळ दोनच अंतराळवीर जाणार आहेत. याचे कारण म्हणजे सुनीता आणि त्यांचे सहकारी यांना परत येताना परत आणता येईल. त्यामुळे या दोन अंतराळवीरांना रोखण्यात आले असून, पुढील मोहिमेत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. मिशनचे कमांडर जेना कार्डमन, पायलट निक हेग, मिशन स्पेशालिस्ट स्टेफनी विल्सन आणि रशियन कॉस्मोनॉट मिशन स्पेशालिस्ट अलेक्झांडर गोर्बुनोव यांच्यासोबत जाण्याची सुरुवातीची योजना होती. आता रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव आणि पायलट निक हेग हे दोनच पुरुष अंतराळवीर तेथे जातील.
अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या कमर्शियल क्रू प्रोग्राममध्ये त्याचा समावेश आहे. SpaceX च्या सहकार्याने स्पेस स्टेशनची ही ९वी रोटेशनल मिशन आहे, ज्यामुळे स्पेस स्टेशनवर सतत संशोधन करता येईल. जगाला हवामानाची अचूक माहिती मिळत राहिली पाहिजे. दोन दशकांहून अधिक काळ, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेहमीच एक अंतराळवीर असतो. यामुळे तो कधीच रिकामा राहिला नाही. त्यामुळे अंतराळवीर तेथे सातत्याने जात आहेत