सुरक्षा परिषदेत सुधारणा अत्यावश्यक

यूएनमधील सर्वसाधारण सभेत मोदी यांची आग्रही भूमिका
Modi on the US tour on the occasion of the Quad Conference
पंतप्रधान नरेंद्र मोदीPudhari File Photo
Published on
Updated on

न्यूयॉर्क; अनिल टाकळकर/वृत्तसंस्था : मानवताचे यश युद्धभूमीवर नसून सामूहिक बलस्थानात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील सुधारणेबाबतची आग्रही मागणी केली. क्वाड परिषदेनिमित्त मोदी यांनी अमेरिका दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारणसभेत सुरक्षा परिषदेतील सुधारणेचा पुनरूच्चार केला. जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून त्यासाठी सुरक्षा परिषदेचा विस्तार अत्यावश्यक असल्याची आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

भारतातील गुंतवणुकीस अमेरिकन कंपन्या उत्सुक

तिसर्‍या कार्यकाळात (2024-29) जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी आपले सरकार प्रयत्न करणार असून भारताच्या या विकास पर्वा चा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांच्या सीईओंज ना केले.

ते म्हणाले की, देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक विकासाच्या संधींचा उपयोग करून जगासाठी संयुक्तपणे भारतात उत्पादनाचा विकास, डिझाइनिंग आणि उत्पादन करणे हे नावीन्यपूर्णतेच्या दिशेने जाण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल.

बौद्धिक संपदा संरक्षणासाठी आणि तंत्रज्ञानाच्या नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे निदर्शनास देऊन मोदी यांनी देशात विशेषत : इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात होत असलेल्या आर्थिक परिवर्तनाकडे या उद्योगांचे लक्ष वेधले. भारताला सेमीकंडक्टर उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

मोदी यांनी देशाला बायोटेक पॉवरहाऊस म्हणून विकसित करण्यासाठी भारताच्या इखज ए3 (पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि रोजगारासाठी जैवतंत्रज्ञान) धोरणाचाही संदर्भ दिला. एआय म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या विषयावर त्यांनी भारताचे याबाबतचे धोरण सर्वांसाठी एआय ला प्रोत्साहन देण्याचे आहे , तसेच त्याचा वापर नैतिकरीत्या आणि जबाबदारीने करण्यावर भर देणारे आहे , असे सांगितले.

भारत जागतिक तंत्रज्ञान केंद्र होणार

नावीन्यतेला महत्त्व देण्याच्या धोरणांमुळे आणि बाजारपेठेच्या भरभराटीच्या संधींमुळे भारताचे जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून महत्त्व वाढत असल्याचे सांगून त्याबद्दल उपस्थित सीईओंजनी भारताची प्रशंसा केली. भारतात स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणे ही देशातील नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी असेल, यावर सहमती दर्शवत त्यांनी भारतासोबत गुंतवणूक आणि सहयोग करण्यात आपल्याला स्वारस्य असल्याचे आवर्जून सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news