इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले; हिजबुल्‍लाचे तळ उद्ध्वस्‍त

बोगद्यात घुसून हल्‍ले...ब्‍लू लाईन ओलांडून इस्रायली सैन्याची कारवाई
israel ground attack on lebanon
इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले; हिजबुल्‍लाचे तळ उद्ध्वस्‍त File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

इस्रायलने ब्‍लू लाईन ओलांडून लेबनॉनची सीमा पार केली आहे. आता इस्रायलने थेट जमिनीवरून हल्‍ले सुरू केले आहेत. इस्रायलचे शेकडो रणगाडे यावेळी लेबनॉनमधील हिजबुल्‍लाच्या तळांवर आगीचे गोळे फेकत आहेत. इस्रायलकडून हे सीमित, स्‍थानिक आणि अचुक हल्‍ले असल्‍याचे म्‍हटलंय. जेणेकरून हिजबुल्‍लाहच्या दहशतवादी ठिकाणांना नष्‍ट करता येईल. (israel attack)

हे ऑपरेशन नॉर्दन एरोसची पुढची स्‍टेज आहे. इस्ररायली सैन्याच्या माहितीनुसार, त्‍यांच्याकडे जी माहिती आहे. त्‍यानुसार हल्‍ले करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने हिजबुल्‍लाहची ठिकाणे आहेत.

हिजबुल्लाहचे हे तळ लेबनॉनच्या गावांमध्ये आहेत. जे सीमेजवळ आहेत. इस्रायली सैन्याचे रणगाडे एका विशेष रणनीतीनुसार माग्रक्रमण करत हल्‍ले चढवत आहेत. या सैन्याला अशा हल्‍ल्‍यांसाठी विशेष ट्रेनिंग देण्यात आले आहे.

जमिनीवरून हल्‍ला करण्यासाठी गेलेल्‍या इस्रायली सेनेला वायुसेना सपोर्ट करत आहे. ज्‍या ठिकाणी जमिनीवरून हल्‍ले करताना सेनेला अडचणी येतील त्‍या ठिकाणी वायुसेनेकडून बॉम्‍बवर्षाव करून रस्‍ता मोकळा करण्यात येत आहे.

इस्रायली सैन्याने म्‍हंटले आहे की, हल्‍ल्‍याचा निर्णय राष्‍ट्राच्या वरीष्‍ठ नेत्‍यांकडून घेण्यात आला आहे. ऑपरेशन नॉर्दन एरो च्या माध्यमातून हिजबुल्‍लाहला पूर्णपणे नष्‍ट करण्याची ही मोहिम आहे. हिजबुल्लाची तपशीलवार माहिती सातत्याने गोळा केली जात आहे.

गाझा पट्टीवर केलेल्‍या चुका आम्‍ही येथे करणार नसल्‍याचे इस्रायली सैन्याने म्‍हटले आहे. त्‍याचबरोबर इस्रायली सैन्याकडून चारी बाजुंनी असलेल्‍या शत्रु आणि सीमांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. कारण लेबनॉनच्या समर्थनासाठी बाकी देशांकडून देखील हल्‍ले होण्याची शक्‍यता आहे.

इस्रायली सैन्याने म्‍हटलंय की, हे हल्‍ले सीमित आहेत. अचुक लक्षावर हल्‍ले केले जात आहेत. यामध्ये निशाण्यावर फक्‍त हिजबुल्‍ला आहे, लेबनॉनचे सर्वसामान्य नागरिक नाहीत. लेबनॉनमध्ये होणारे हल्‍ले हे जास्‍त काळपर्यंत होणार नाहीत. फक्‍त हिजबुल्‍लाला नष्‍ट करण्यापर्यंतच हे हल्‍ले सुरू राहतील.

आता जमिनीवरून हल्‍ले करण्यात येत आहेत, ज्‍यामुळे लेबनॉनची हिजबुल्‍लाहच्या तावडीतून सुटका करता येईल. गेल्‍या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्‍या या हल्‍ल्‍यात आतापर्यंत एक हजार लोक मारले गेले आहेत. तर जवळपास १० लाख लोक विस्‍थापित झाले आहेत.

गाझा पट्टी सारखीच लेबनॉनमध्ये देखील हिजबुल्‍लाच्या लडाख्यांकडून सुरूंग बनवण्यात आल्‍या आहेत. इस्रायलच्या सैन्याकडून हे सुरूंगही नष्‍ट केले जात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news