हिजबुल्लाच्‍या बंकरमध्‍ये अब्जावधींचे सोने आणि रोकड : इस्रायलचा दावा

लेबनॉनमधील हॉस्पिटलखाली लपवलाय खजिना!
hamas and israel
Israel-Hezbollah War : इस्‍त्रायल सैन्‍य दलाचे प्रातिनिधिक व्‍हिडिओ Xवर शेअर करत बैरुत शहराच्‍या मध्यभागी अल सहेल हॉस्पिटलच्या खाली मोठा खजिना लपवला असल्‍याचा दावा केला आहे. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्‍त्रायल आणि हमासमध्‍ये सुरु असणार्‍या रक्‍तरंजित संघर्षाला आता एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. मागीण काही दिवसांपासून हा संघर्ष आताल लेबनॉन आणि इराणपर्यंत जावून पोहचला आहे. नुकतीच इस्‍त्रायलने धडक कारवाई करत गाझामधील हमासचा म्‍होरक्‍या याह्या सिनवार आणि बेरूतमधील हिजबुल्ला दहशतवादी संघटनेचा म्‍होरक्‍या हसन नसरल्लाह या दोघांचाही खात्‍मा केला आहे. आता आता इस्रायली संरक्षण दलाने हिजबुल्लाहच्या आर्थिक केंद्राविषयी गुप्तचर माहिती उघड केली आहे. नसरल्ला ठार झाला त्‍या बंकरमध्‍ये अब्‍जावधींची रोकड आणि सोने असल्‍याचा खजिना आहे, असा धक्‍कादायक दावा इस्‍त्रायलने केला आहे.

बंकरमध्‍ये तब्‍बल 500 दशलक्ष डॉलर्सचा साठा...

हिजुबुल्‍लाचे गुप्त बंकर हे लेबनॉनची राजधानी बैरुत शहराच्‍या मध्यभागी अल सहेल हॉस्पिटलच्या खाली आहे. हा हसन नसरल्लाचा बंकर होतो, जिथे कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोकड आहे. इस्‍त्रायल सैन्‍य दलाचे (आयडीएफ) प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी म्‍हटलं आहे की, आज मी एका ठिकाणाविषयी सार्वजनिक गुप्तचर माहिती देत ​​आहे. दक्षिण बेरूतमधील अल सहेल हॉस्पिटलच्या खाली लपलेल्या या बंकरमध्ये आमच्‍या अंदाजानुसार 500 दशलक्ष डॉलर्सची रोकड आणि सोने आहे, स्रायली सैन्याने हिजबुल्लाच्या या आर्थिक लक्ष्यांवर अचूक हल्ले केले. कडेकोट सुरक्षा असलेले गुप्त ठिकाण लक्ष्य होते. येथे एक भूमिगत तिजोरी आहे, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड आणि सोने ठेवण्यात आले होते. हिजबुल्ला हा पैसा इस्रायलवर हल्ला करण्यासाठी वापरत होता, असा दावाही त्‍यांनी केला आहे.

आम्‍ही हॉस्पिटलवर हल्ला करणार नाही

इस्रायलने लेबनॉनसह आंतरराष्ट्रीय संस्थांना हिजबुल्लाला दहशतवादाला निधी देण्यासाठी आणि इस्रायलवर हल्ला करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे. तसेच इस्त्रायलचे युद्ध लेबनीज लोकांशी नसून हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेशी आहे. आम्‍ही हॉस्पिटलवर हल्ला करणार नाही, असेही स्‍पष्‍ट केले आहे. दरम्‍यान, यापूर्वी इस्रायलने हिजबुल्लाशी संबंध असलेल्या बँकेवर हल्ला केला होता.

पंतप्रधान नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ ड्रोन हल्ला

नुकतेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ हिजबुल्लाने ड्रोन हल्ला केला होता. यानंतर नेतान्याहू म्हणाले होते, ' माझ्‍या हत्येचा प्रयत्न करणार्‍यांना तसेच इस्रायलला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यापासून आम्‍हणाला रोखू शकणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news