पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल गुप्तचर संस्था मोसादच्या मुख्यालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने केला आहे. आज (दि.25) हिजबुल्लाहने लेबनॉनमधून इस्त्रायलवर हल्ले केले. दरम्यान, टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाने देशाच्या राजधानीजवळील मोसाद मुख्यालयावर कादर-1 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले मात्र यामुळे मोसादच्या मुख्यालयाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. इस्रायलने 'डेव्हिड स्लिंग' नावाच्या हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे हे क्षेपणास्त्र हवेत नष्ट केली.
सोमवारी इस्रायलने केलेला हल्ला आणि यानंतर आज लेबनॉनचा प्रतिहल्ला यामुळे आता युद्धाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहेत. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये ५०० हून अधिक जण ठार झाले आहेत. दरम्यान, हिजबुल्लाहने बुधवारी सांगितले की, त्यांनी तेल अवीवजवळील इस्रायली गुप्तचर संस्था मोसादच्या मुख्यालयाला लक्ष्य करत बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. जवळपास वर्षभर चाललेल्या युद्धानंतर हिजबुल्लाहने पहिल्यांदाच बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा केला आहे. इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे की, हिजबुल्लाहने डागलेले क्षेपणास्त्र आयर्न डोमने रोखण्यापूर्वी प्रथमच राजधानी तेल अवीवमध्ये पोहोचले.
हिजबुल्लाहने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी साडेसहा वाजता तेल अवीवच्या बाहेरील मोसाद मुख्यालयावर 'कादर 1' बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. गाझामधील लोकांच्या समर्थनार्थ आणि लेबनॉन आणि तेथील लोकांचे रक्षण करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
लष्करी विश्लेषक रियाद काहवाजी यांनी सांगितले की, हिजबुल्लाहने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची ही पहिलीच वेळ आहे. या क्षेपणास्त्रांची निर्मिती इराणमध्ये झालेली आहे. 7 ऑक्टोबर २०२३ रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यापासून हिजबुल्ला आणि इस्रायलमध्येही संघर्ष सुरू आहे. हमासच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये सुरू झालेल्या युद्धात हिजबुल्लासह मध्यपूर्वेतील इतर इराण समर्थित दहशतवादी गट सामील झाले आहेत.
टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाने देशाच्या राजधानीजवळील मोसाद मुख्यालयावर कादर-1 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले मात्र यामुळे मोसादच्या मुख्यालयाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. इस्रायलने 'डेव्हिड स्लिंग' नावाच्या हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे हे क्षेपणास्त्र हवेत नष्ट केली. इस्त्रायल सैन्यदलाने म्हटलं आहे की, हिजबुल्लाने ज्या भागातून रॉकेट डागले होती ती हवेतच नष्ट केली गेली. तेल अवीवमध्ये हिजबुल्लाहने हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इस्त्रालय सैन्यदलाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की, इस्रायलने मंगळवारी उत्तर इस्रायलमध्ये 300 रॉकेट डागले. यापूर्वी इस्रायलने 1600 लक्ष्यांवर हल्ले केले होते.
अलीकडच्या काळात इस्रायलने गाझावरून लक्ष हटवून लेबनॉनमध्ये मोठे युद्ध सुरू केले आहे. लेबनॉन आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान ५५८ जण ठार झाले आहेत. लेबनॉनने 1975-90 च्या गृहयुद्धानंतर देशातील हिंसाचाराचा सर्वात प्राणघातक दिवस ठरला आहे.