पुढारी ऑनलाईन :
इस्रायली हल्ल्यात हिजबुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाह मारला गेल्यानंतर हिजबुल्लाहने आपल्या नव्या नेत्याची तात्काळ घोषणा केल्याचे समाेर आले आहे. हसन नसरल्लाहनंतर त्याच्या जागी आता हाशिम सफीद्दीनला हिजबुल्ल्लाहने प्रमुख पदाची सुत्रे सोपवली आहेत. तो हसन नसरुल्लाहचा चुलत भाऊ आहे. १९६४ मध्ये दक्षिणी लेबनान मध्ये जन्माला आलेल्या हाशिम सफीद्दीन हा लेबनानी शिया धर्मगुरू आणि हिजबुल्लाहचा ज्येष्ठ नेता आहे. (Hashim Safi Al Din)
असेही सांगण्यात येत आहे की, हाशिम सफीद्दीन हा इस्रायली हल्ल्यांपासून स्वत:चा बचाव करत फिरत आहे. ताे हिजबुल्लाचे राजकीय व्यवहार पाहत आला आहे. तो कार्यकारी परिषदेचे प्रमुख पदही आहे. याशिवाय संघटनेच्या लष्करी कारवायांची आखणी करणाऱ्या जिहाद कौन्सिलचाही तो अध्यक्ष आहे. हाशिम काळी पगडी घालतो.
हाशिम स्वत:ला पैगंबर मोहम्मद यांचा वंशज असल्याचे सांगतो. पण अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने 2017 मध्ये त्याला दहशतवादी घोषित केले आहे. कारण जेंव्हा इस्रायलने हिजबुल्लाच्या वरीष्ठ कमांडरची हत्या केली तेंव्हा हाशिमने इस्रायलविरोधात युद्ध पुकारले होते.