इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये मंकी पॉक्स या आजाराचा आणखी एक रुग्ण आढळला असून आजअखेर आढळलेल्या या आजाराच्या रुग्णांची पाकिस्तानातील संख्या 5 झाली आहे.
पाकमधील सर्व पाचही रुग्ण अन्य देशांतून परतलेले आहेत. पाचवा रुग्ण कराची विमानतळावर करण्यात आलेल्या प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणीत आढळला. रुग्णाचे वय 51 आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 14 ऑगस्ट रोजी मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलेले आहे.